25 October 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअर विक्रमी उच्चांकावरून 32% घसरला, ही स्वस्तात खरेदीची संधी आहे का - NSE: NHPC Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL NBCC Share Price | एनबीसीसी शेअरबाबत मोठे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत परतावा देणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 38% पर्यंत कमाई होईल - NSE: BEL Rattan Power Share Price | 13 रुपयाचा रतन इंडिया पॉवर फोकसमध्ये, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RTNPOWER
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर 100 रुपयांच्या खाली घसरला, ही खरेदीची संधी, नेमकं कारण काय - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 5.73% घसरून 96.70 रुपयांवर पोहोचला (NSE: NBCC) होता. एकाबाजूला शेअर १०० रुपयांच्या खाली घसरल्याने ही खरेदीची मोठी संधी असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. कारण एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मागील काही दिवसात मजबूत झाली आहे. NBCC लिमिटेड कंपनीला 127.5 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.87 टक्के घसरून 95.81 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीला 127.5 कोटी रुपयांचे 3 मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले
NBCC लिमिटेड कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगनुसार, ‘IIFL लिमिटेड, ऑईल इंडिया लिमिटेड, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, EDCIL इंडिया लिमिटेड, GS1 इंडिया आणि ब्युरो ऑफ इमिग्रेशन यांच्याकडून मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत.

NBCC लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘IIFCL कंपनीने नवी दिल्लीतील नौरोजी नगर येथील E300, तिसरा मजला, टॉवर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि नवी दिल्ली येथील कंपनीच्या कार्यालयाच्या जागेत इंटिरिअर किंवा फिट-आऊटचे काम करण्यासाठी NBCC लिमिटेड कंपनीला २६ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट दिली आहे.

तसेच, नवी दिल्ली येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवर-बी च्या तळमजल्यावर असलेल्या बीजी ०१ आणि बीजी ०२ येथे अंतर्गत काम करण्यासाठी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडकडून ३.३ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, अशी माहिती NBCC लिमिटेड कंपनीने दिली आहे.

नवी दिल्ली येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर टॉवरच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील कार्यालयाच्या जागेत अंतर्गत नागरी कामे करण्यासाठी आयबीकडून २०.४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. NBCC लिमिटेड कंपनीला एकूण १२७.५ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत.

शेअरने दिलेला परतावा
NBCC शेअरने मागील ६ महिन्यात 15.85% परतावा दिला. मागील १ वर्षात या शेअरने 132.45% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 334.22% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 77.20% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x