22 January 2025 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | मंगळवारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण (NSE: NBCC) झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.083 टक्के वाढून 96.73 रुपयांवर पोहोचला होता. मागील काही दिवसात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर प्राईस घसरली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.39 टक्के घसरून 93.25 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीला ३ नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ३ नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ऑइल इंडिया लिमिटेड, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून दिल्ली येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर संबंधित कार्यालयासाठी इंटिरिअर फिट-आऊट कामांसाठी कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे.

कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत १५०० कोटी रुपये
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत अंदाजे 80.3 कोटी रुपये आहे. यामध्ये ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीने ५१ कोटी रुपये, IIFL ने २६ कोटी रुपये आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेड कंपनीने ३.३ कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टचा समावेश आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला प्राप्त झालेल्या या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत १५०० कोटी रुपये आहे.

महाराष्ट्र गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ परिसराच्या विकासासाठी NBCC ची उपकंपनी HSCL कंपनीला १००० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच झारखंडमधील बोकारो स्टील प्लांटमध्ये रूफटॉप सोलर सिस्टीमचे डिझाइन, इन्स्टॉलेशन आणि पुरवठा करण्यासाठी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला १९८ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

तसेच ओडिशामध्ये एकात्मिक क्रीडा संकुल बांधण्यासाठी ५० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट, दिल्लीतील जवाहर नवोदय विद्यालयांसाठी कायमस्वरूपी कॅम्पस बांधण्यासाठी ६५.१५ कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट आणि कांडला विशेष आर्थिक क्षेत्रातील विविध कामांसाठी २५.२५ कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टचा समावेश आहे.

शेअरची टार्गेट प्राईस
याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, ‘शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून NBCC लिमिटेड कंपनी शेअरवर दबाव आहे. NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअर शॉर्ट टर्म मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे. या शेअरला १२०-१२१ रुपयांच्या आसपास जोरदार रेझिस्टन्स आहे. NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअर जोपर्यंत ही पातळी पार करत नाही, तोपर्यंत खरेदी करू नयेत. मात्र, लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून शेअरला १०० रुपयांच्या आसपास मजबूत सपोर्ट आहे. त्यामुळे गुंतवणूकदार लॉन्ग टर्मच्या दृष्टीकोनातून शेअर खरेदी करू शकतात. NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने 120-121 रुपयांची पातळी पार केल्यास तो 132 रुपयांपर्यंत वाढू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

शेअर टेक्निकल चार्ट
तांत्रिक आघाडीवर NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिम्पल मूव्हिंग अ‍ॅव्हरेज तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या लाँग टर्म मूव्हिंग अ‍ॅव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे. NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 139.83 रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 40.50 रुपये आहे. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 25,798 कोटी रुपये आहे.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने 7.56% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने 131.42% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने 332.29% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 76.42% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x