16 January 2025 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 435% परतावा

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 188.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 15000 कोटी रुपये आहे. ( एनबीसीसी इंडिया अंश )

एनबीसीसी इंडिया कंपनीला श्रीनगर विकास प्राधिकरणाने ही ऑर्डर दिली आहे. गुरुवारी एनबीसीसी इंडिया स्टॉक 168.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर शुक्रवारी हा स्टॉक 188.50 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 186.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एनबीसीसी इंडिया ही कंपनी नवीन ऑर्डर अंतर्गत 406 एकर जागेवर सॅटेलाइट टाउनशिप विकसित करणार आहे. प्रकल्प श्रीनगरमधे उभारला जाणार आहे. एनबीसीसी इंडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 33000 कोटी रुपये आहे. हा प्रोजेक्ट पुढील 5 वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. या प्रोजेक्टमध्ये निवासी भूखंड, व्हिला, अपार्टमेंट, व्यावसायिक कार्यालये, इनडोअर स्पोर्ट्स सेंटर आणि सर्व आधुनिक सुविधांसह 5 स्टार रिसॉर्ट्सचे बांधकाम केले जाणार आहे.

जून 2024 मध्ये एनबीसीसी इंडिया या बांधकाम कंपनीला ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीकडून 70 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. मागील एका वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 280 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 48.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 9 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 188.50 रुपये किमतीवर पोहचला होता.

2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया स्टॉक 130 टक्के मजबूत झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स 81.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 2 वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 435 टक्के नफा कमावून दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 198.25 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 46.61 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE Live 12 August 2024.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x