24 November 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259
x

NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर

NBCC Share Price

NBCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 157 रुपये किमतीवर पोहचले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. एनबीसीसी या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28190 कोटी रुपये आहे. एनबीसीसी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 72000 कोटी रुपये आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 38 रुपये होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 96 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 80 रुपयेवरून वाढून 157 रुपये किमतीवर पोहचले आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी एनबीसीसी स्टॉक 1.53 टक्के घसरणीसह 155.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील एका वर्षात एनबीसीसी स्टॉक 42 रुपये या नीचांकी किमतीवरून 276 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 170 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 900 टक्के वाढला आहे.

नुकताच एनबीसीसी कंपनीला एकूण 878 कोटी रुपये मूल्याच्या चार ऑर्डर मिळाल्या आहेत. यामध्ये कंपनीला 700 कोटी रुपये मूल्य असलेल्या ऑर्डर अंतर्गत 17.4 एकर जमिनीचा विकास करण्याचे काम देण्यात आले आहे. यासह कंपनीला दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमध्ये बॉईज कॉलेजच्या बांधकामासाठी 70 कोटी रुपयेचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

एनबीसीसी इंडिया कंपनीला तेलंगणा, हैदराबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे प्रशिक्षण केंद्र आणि कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 9 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. तसेच गुवाहाटी, आसाम येथे प्रगत प्रयोगशाळा सुविधा तयार करण्यासाठी ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीने एनबीसीसी कंपनीला 99.84 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

एनबीसीसी इंडिया ही सरकारी बांधकाम कंपनी भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करते. या कंपनीचा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार विभाग निवासी, व्यावसायिक, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक संस्थांचे बांधकाम प्रकल्प हाताळतो. ही कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य मानली जाते. तसेच ही कंपनी उंच चिमणी आणि कूलिंग टॉवर्स यासारख्या जटिल संरचनांमध्ये एक्स्पर्ट मानली जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE Live 13 June 2024.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x