17 November 2024 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

NBCC Share Price | सरकारी कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 वर्षात दिला 307% परतावा

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 188.80 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत धावत आहे. या स्टॉकमधे वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीला 411.45 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )

HSCC इंडिया ही कंपनी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. नुकताच HSCC इंडिया लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि आयुष विभागाकडून एक ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला बुलढाणा येथे 100 विद्यार्थ्याची क्षमता असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे रुग्णालय बांधण्याचे काम देण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 1.28 टक्के वाढीसह 190 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 307 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 46.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 188.80 रुपये किमतीवर पोहचला होता. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया स्टॉक 130 टक्के वाढला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 81.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 188 रुपये किमतीच्या पार गेला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. एकट्या जून 2024 या महिन्यात एनबीसीसी इंडिया कंपनीने 1500 कोटी रुपयेपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत. या कंपनीला REC लिमिटेड कंपनी कडून देखील 100 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर मिळाली होती. तसेच या कंपनीला ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने देखील 70 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE Live 30 July 2024.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x