14 January 2025 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

NBCC Share Price | ब्रेकआउट देणार NBCC शेअर! स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, फायदा घ्या

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर (NSE: NBCC) परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 195 रुपये किमतीवर ब्रेकआउट देऊ शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 257 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची (NSE:NBCC) किंमत 459 टक्के वाढली आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 282 टक्के वाढले आहेत. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )

9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 198.25 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. 25 ऑगस्ट 2023 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 48.55 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.57 टक्के घसरणीसह 180.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एनबीसीसी इंडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 32,850 कोटी रुपये आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, जर या स्टॉकने 190 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला तर हा स्टॉक अल्पावधीत 220-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 170 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सध्या 53.48 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे.

तज्ञांनी एनबीसीसी इंडिया स्टॉक खरेदी करताना 165 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सँक्टम वेल्थचे डेरिव्हेटिव्ह अँड टेक्निकल फर्मच्या तज्ञांच्या मते, एनबीसीसी इंडिया स्टॉक पुढील काळात 175-170 रुपये किमतीवर येऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 162 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. एनबीसीसी इंडिया स्टॉकचा बीटा 1.5 वर असून तो उच्च अस्थिरता दर्शवतो. एनबीसीसी इंडिया स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

एनबीसीसी इंडिया ही कंपनी मूल्यवर्धित बांधकाम सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि इंजिनिअरिंग प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन, PMC विभाग नागरी बांधकाम प्रकल्प, राष्ट्रीय सुरक्षेसाठी पायाभूत सुविधांची कामे, नागरी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनासाठी प्रकल्प अंमलबजावणी एजन्सी म्हणून काम करते. तसेच ही कंपनी पूर्वोत्तर विभागात विकासात्मक कामांमध्ये गुंतलेली आहे.

News Title | NBCC Share Price NSE: NBCC 23 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x