21 December 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायदा घ्या - NSE: NBCC Gold Rate Today | खुशखबर, लग्नाच्या हंगामात आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगार आणि महागाई भत्ता लवकरच वाढणार, अपडेट जाणून घ्या Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा Salary CIBIL Score | 90% पगारदारांना माहित नाही, खराब झालेला सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी किती वेळ लागेल, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, बंपर परतावा आणि अनेक पटीने पैसा वाढवणाऱ्या फंडाच्या खास योजना सेव्ह करा
x

NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायदा घ्या - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | शुक्रवारी नवरत्न कंपनी एनबीसीसी लिमिटेड कंपनीने नव्या कॉन्ट्रॅक्टची माहिती दिली हे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने २० डिसेंबर रोजी स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीला अनेक कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टचे मूल्य जवळपास ३०० कोटी रुपये आहे. शुक्रवारी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर 3.21 टक्क्यांनी घसरून 93.98 रुपयांवर ट्रेड करत होता. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)

नवीन कॉन्ट्रॅक्टची माहिती

एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीकडून २००.६० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार एनबीसीसी कंपनीला ऑईल हॉस्पिटल बांधायचा आहे. याशिवाय एनबीसीची लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या एचएससीसी इंडिया कंपनीला ९८.१७ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. विशेष म्हणजे एनबीसीसी कंपनीला या महिन्याच्या सुरुवातीला ६०० कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले होते.

एनबीसीसी कंपनीची आर्थिक स्थिती

दुसऱ्या तिमाहीत एनबीसीसी लिमिटेड कंपनीला एकूण १२५.१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ५२.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एनबीसीसी कंपनीला ८१.९० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत एनबीसीसी कंपनीचा महसूल २४५८.७० कोटी रुपयांवर पोहोचला होता.

एनबीसीसी शेअरची कामगिरी

गेल्या ५ दिवसात एनबीसीसी शेअरमध्ये ४.८६ टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील ६ महिन्यात एनबीसीसी शेअर 13.35 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, तरीही या शेअरने गुंतवणूकदारांना ८८ टक्के परतावा दिला आहे. एनबीसीसी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 139.90 रुपये होता. मागील 2 वर्षात या शेअरने 240 टक्के परतावा दिला आहे. एनबीसीसी कंपनीत केंद्र सरकारचा ६१.८० टक्के हिस्सा आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डर्सचा हिस्सा २५.०४ टक्के आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price Saturday 21 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x