30 December 2024 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

NCC Share Price | झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेला स्टॉक तेजीत वाढतोय, शेअर परतावा आणि कामगिरी जाणून घ्या

NCC Share Price

NCC Share Price | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या देखील मोठ्या गुंतवणुकदार आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 93.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 65 रुपयांवरून वाढून 98 रुपयांवर गेले आहेत. एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 51 रुपये होती. तर कंपनीचे बाजार भांडवल 5839 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, NCC Share Price | NCC Stock Price | BSE 500294 | NSE NCC)

एनसीसी लिमिटेड शेअर्स 75 टक्के वाढले :
एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील 7 महिन्यात 75 टक्केपेक्षा अधिक वर गेले आहेत. 21 जून 2022 रोजी कंपनीचे एनसीसी लिमिटेड शेअर्स 51 रुपयांवर ट्रेड करत होते. तर 9 फेब्रुवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर एनसीसी लिमिटेड शेअर 93 रुपये किमतीवर बंद झाले आहेत. मागील 6 महिन्यांत एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 40 % परतावा कमावून दिला आहे. तर एनसीसी लिमिटेड शेअर्सने गेल्या 22 वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. 9 फेब्रुवारी 2001 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.33 रुपया ट्रेड करत होते. 10 फेब्रुवारी 2023 रोजी एनसीसी लिमिटेड शेअर्स BSE इंडेक्सवर 93.50 रुपये किमतीवर बंद झाले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 6900 टक्के नफा कमावला आहे.

रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एनसीसी लिमिटेड कंपनीच्या डिसेंबर तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे एनसीसी लिमिटेड कंपनीमध्ये 13.09 टक्के भाग भांडवल आहे, म्हणजे त्यांच्याकडे एकूण 8.21 कोटी शेअर्स आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे जुलै – सप्टेंबर 2022 तिमाहीमध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीमध्ये 7.93 कोटी शेअर्स होते. ज्याचे प्रमाण 12.64 टक्के होते. याचा अर्थ रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2022 च्या तिमाहीत एनसीसी लिमिटेड कंपनीमध्ये 0.45 टक्के गुंतवणूक वाढवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NCC Share Price 500294 stock market live on 10 February 2023.

हॅशटॅग्स

#NCC Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x