17 November 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News EPFO Pension Money | पगारदारांनो आता चिंता करण्याची काही गरज नाही, महिन्याला मिळेल 10 हजार पेन्शन - Marathi News HDFC Mutual Fund | फार कमी व्यक्तींना माहित आहे चिल्ड्रन फंड, केवळ 5 हजारांची SIP, तुमच्या मुलांना मिळेल करोडोत परतावा Post Office Scheme | 100 रुपये गुंतवून लाखोंची रक्कम तयार करायची आहे का, मग पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा - Marathi News IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024
x

Nestle India Share Price | तब्बल 8800 टक्के पेक्षा जास्त परतावा देणारा शेअर, डिव्हीडंड देखील जाहीर, स्टॉक डिटेल्स पहा

Nestle India Share Price

Nestle India Share Price | ‘नेस्ले’ या ‘मॅगी नूडल्स’ ब्रँडच्या मालक कंपनीने आपल्या शेअरधारकांना सुखद धक्का दिला आहे. ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 75 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. नेस्ले कंपनीच्या संचालक मंडळाने 21 एप्रिल 2023 हा दिवस अंतिम लाभांशा वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. ही कंपनी डिसेंबर ते जानेवारी या आर्थिक वर्षात काम करते. नेस्ले कंपनीने कॅलेंडर वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत लोकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Nestle India Share Price | Nestle India Stock Price | BSE 500790 | NSE NESTLEIND)

कंपनीची तिमाही कामगिरी :
FMCG कंपनी ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने कॅलेंडर वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत 628 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘नेस्ले इंडिया’ कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 66 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील कॅलेंडर वर्षाच्या चौथ्या तिमाहीत नेस्ले कंपनीने 379 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कॉफी आणि चहा उत्पादक कंपनीच्या चौथ्या तिमाहीतील महसुलात 13.5 टक्के वाढ झाली असून कंपनीने 4,257 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. एक वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत कंपनीने 3748 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

कंपनीच्या शेअर्सची किंमत :
‘नेस्ले इंडिया’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 14 फेब्रुवारी 2003 रोजी नेस्ले कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 529.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नेस्ले इंडिया कंपनीचे शेअर्स 17 फेब्रुवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर 3.11 टक्के घसरणीसह 19,017.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21053 रुपये होती. तर नेस्ले इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 16000 रुपये होती. या कंपनीच्या शेअर्सनी स्थापनेपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 8800 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nestle India Share Price 500790 NESTLEIND stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

Nestle India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x