17 November 2024 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News EPFO Pension Money | पगारदारांनो आता चिंता करण्याची काही गरज नाही, महिन्याला मिळेल 10 हजार पेन्शन - Marathi News HDFC Mutual Fund | फार कमी व्यक्तींना माहित आहे चिल्ड्रन फंड, केवळ 5 हजारांची SIP, तुमच्या मुलांना मिळेल करोडोत परतावा Post Office Scheme | 100 रुपये गुंतवून लाखोंची रक्कम तयार करायची आहे का, मग पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा - Marathi News IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK
x

Nestle India Share Price | करोडपती झाले! नेस्ले इंडिया शेअरने 10000% परतावा देतं गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता अजून एक बातमी

Nestle India Share Price

Nestle India Share Price | नेस्ले इंडिया या FMCG क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहेत. नेस्ले इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 19 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्टॉक स्प्लिट बाबत चर्चा केली जाणार आहे.

स्टॉक स्प्लिटच्या बातमीने नेस्ले इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेस्ले इंडिया कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी नेस्ले इंडिया स्टॉक 0.32 टक्के वाढीसह 23,060.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

लाभांश तपशील
नेस्ले इंडिया कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना शेअरच्या दर्शनी मूल्यावर काही टक्के दराने लाभांश वाटप करण्याचा विचार करत आहे. 19 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याचा अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे. लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला तर कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर लाभांश वाटप करेल.

नेस्ले इंडिया कंपनीने 3 ऑक्टोबर 2023 रोजी सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले होते की, जर कंपनीच्या संचालक मंडळाची मान्यता मिळाली तर दुसऱ्या अंतरिम लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 1 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला जाईल. आणि पात्र गुंतवणूकदारांना त्याचे लाभांश पेमेंट 16 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर दिले जाईल.

शेअरची कामगिरी
मागील 28 वर्षात नेस्ले इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10,000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात नेस्ले इंडिया कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने 2023 या वर्षात 102 रुपये लाभांश वाटप केला आहे. नेस्ले इंडिया कंपनीने 2023 वर्षात आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 75 रुपये अंतिम लाभांश वाटप केला होता. आणि 27 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता. 21 एप्रिल 2023 रोजी नेस्ले इंडिया स्टॉक एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nestle India Share Price today on 05 October 2023.

हॅशटॅग्स

Nestle India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x