22 February 2025 3:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Nexus Select Trust REIT IPO | हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, शेअरची किंमत 95 रुपये, IPO बाबत विशेष बाबी जाणून पैसे लावा

Nexus Select Trust REIT IPO

Nexus Select Trust REIT IPO| ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट REIT’ कंपनी 9 मे 2023 रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. 11 मे 2023 पर्यंत गुंतवणुकदार या IPO मध्ये पैसे लावू शकतात. नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट ही भारतातील ही पहिली ‘रिटेल अॅसेट ऑफर’ कंपनी आहे. सध्या भारतात तीन सूचीबद्ध REITs असून त्या सर्व कार्यालयीन मालमत्तेशी संबंधित व्यापार करतात. आज या लेखात आपण REIT च्या IPO बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

1) REIT म्हणजे काय? :
REIT जागतिक बाजारपेठेत एक लोकप्रिय गुंतवणूक साधन मानले जाते. भारतातील खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी REIT ची भारतात सुरुवात करण्यात आली होती.

2) कंपनीबाबत खास :
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट ही कंपनी भारतातील सर्वात मोठी शॉपिंग मॉल प्लॅटफॉर्म आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 14 प्रमुख शहरांमध्ये असलेल्या 17 उच्च-गुणवत्तेच्या मालमत्तां सामील आहेत.

3) IPO इश्यू साइज :
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीच्या IPO अंतर्गत1,400 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी केले जाणार आहे. त्याच वेळी, 1,800 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहेत. IPO चा आकार आधी 4,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता, मात्र नंतर त्यात घट करण्यात आली.

4) नेक्सस REIT प्राइस बँड :
Nexus Select Trust कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 95-100 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. गुंतवणूकदार कमीत कमी 150 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. याचा अर्थ या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना किमान 15,000 रुपये जमा करावे लागतील.

5) बुकिंग रनिंग लीड मॅनेजर :
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीने IPO बुकिंग रनिंग लीड मॅनेजर म्हणून Morgan Stanley, JP Morgan, Kotak Mahindra Capital, Axis Capital आणि BoA ML यांना नियुक्त केले आहेत.

6) नेक्सस सिलेक्ट IPO स्ट्रक्चर :
या कंपनीच्या IPO मध्ये 75 टक्के कोटा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर 25 टक्के कोटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

7) IPO टाइमलाइन :
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीचा IPO 9 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. IPO ची अंतिम मुदत 11 मे 2023 असेल. कंपनी आपल्या IPO शेअर्सचे वाटप 16 मे 2023 रोजी पूर्ण करेल. ज्यांना IPO शेअर वाटप झाले नाही, त्यांना 17 मे रोजी रिफंड मिळेल. नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट REIT कंपनीचे शेअर्स 18 मे 2023 पर्यंत गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. आणि 19 मे 2023 रोजी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nexus Select Trust REIT IPO is going to open soon check details on 08 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nexus Select Trust REIT IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x