16 April 2025 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

NHPC Share Price | 95 रुपयाचा PSU शेअर तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, मालामाल करणार स्टॉक - Marathi News

Highlights:

  • NHPC Share PriceNSE: NHPC – एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीचा संयुक्त उपक्रम
  • प्रकल्पाचा तपशील – NHPC Share
  • गुंतवणूकदारांना 56% CAGR परतावा दिला
NHPC Share Price

NHPC Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी पॉवर सेक्टरमधील शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. एनएचपीसी लिमिटेड (NSE: NHPC) म्हणजेच नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्येही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 118.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 48.48 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.17 टक्के वाढीसह 95.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीचा संयुक्त उपक्रम
NHPC लिमिटेड आणि आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आंध्र प्रदेशमध्ये पंप्ड स्टोरेज हायड्रो पॉवर प्रकल्प आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एक संयुक्त उपक्रम स्थापन केल्याची माहिती दिली आहे. हा संयुक्त उपक्रम सुरुवातीला 1800 मेगावॅट क्षमतेच्या एकत्रित स्थापित क्षमतेसह यागंती पीएसपी आणि राजुपालम पीएसपी प्रकल्पांची हाताळणी करणार आहे. या संयुक्त उपक्रम कंपनीकडे 1 कोटी रुपये प्रारंभिक अधिकृत शेअर भांडवल असेल. NHPC आणि APGENCO या दोन्ही कंपन्यांना संयुक्त उपक्रम कंपनीचे संचालक आणि मंडळाचे अध्यक्ष नामनिर्देशित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

प्रकल्पाचा तपशील
NHPC लिमिटेड कंपनीने महाराष्ट्र राज्य सरकारसोबत 7,350 मेगावॅट क्षमतेचे पंप्ड स्टोरेज प्रकल्प स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. NHPC ही भारतातील आघाडीची जलविद्युत कंपनी आहे. ही कंपनी वीज निर्मिती आणि विक्री तसेच बांधकाम प्रकल्पांचे व्यवस्थापन देखील करते. सध्या नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ही कंपनी 7,097 मेगावॅट क्षमतेसह प्रमुख जलस्रोतांमधून नवीन जलविद्युत प्रकल्प विकसित करते. सध्या या कंपनीकडे एकूण 10,449 मेगावॅट क्षमतेचे 15 सौर ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा उपक्रम आहेत.

गुंतवणूकदारांना 56% CAGR परतावा दिला
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनीने 2025 मध्ये 800 MW आणि 2026 मध्ये 2,000 MW वीज निर्मिती क्षमता जोडण्याची योजना आखली आहे. यासह कंपनीने पंप स्टोरेज आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी अनेक राज्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 95,000 कोटी रुपये आहे.

मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 56 टक्के CAGR परतावा दिला आहे. या स्टॉकचा PE रेशो 28x आहे, तर ROE 10 टक्के आहे. तसेच या कंपनीचा ROCE 8 टक्के आहे. जून 2024 पर्यंत एलआयसी कंपनीने नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे 3.84 टक्के भागभांडवल धारण केले होते. या कंपनीचे शेअर 48.48 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 98 टक्क्यांनी वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price 01 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या