17 November 2024 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

NHPC Share Price | या PSU शेअरची प्राईस मोठी उंची गाठणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी स्टॉकबाबत तज्ञांनी नवीन अपडेट जाहीर केली आहे. तज्ञाच्या मते पुढील काही दिवसात हा स्टॉक मजबूत वाढू शकतो. गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनएचपीसी स्टॉक 2 टक्के वाढीसह 103.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. तज्ञांच्या मते, एनएचपीसी स्टॉक पुढील काळात 120 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ( एनएचपीसी कंपनी अंश )

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, एनएचपीसी स्टॉकमध्ये 20 टक्के परतावा देण्याची क्षमता आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 0.19 टक्के घसरणीसह 103.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी एनएचपीसी स्टॉकवर 120 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ही किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 93 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

3 जून 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 117.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर पोहचला होता. एनएचपीसी स्टॉक BSE 200 निर्देशांकाचा भाग आहे. मागील एका वर्षात एनएचपीसी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 125 टक्के वाढली आहे. मागील दोन वर्षात एनएचपीसी स्टॉक 228 टक्के आणि तीन वर्षात 285 टक्के मजबूत झाला आहे.

एनएचपीसी ही एक सरकारी वीज कंपनी आहे. नुकताच जॅक्सन ग्रीन कंपनीने एनएचपीसी कंपनीसोबत 400 मेगावाट क्षमतेच्या सौर ऊर्जा खरेदी करण्याचा करार केला आहे. हा प्रकल्प राजस्थानमध्ये उभारला जाणार आहे, आणि त्यांतून निर्माण होणारी वीज चार लाख घरांना पुरवली जाणार आहे. यासह हा प्रोजेक्ट क्लीन एनर्जी निर्मितीशी संबंधित असलेल्या सेंट्रल ग्रीडसोबत जोडला जाणार आहे. हा प्रकल्प पुढील 24 महिन्यांत कार्यान्वित केला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NHPC Share Price NSE Live 05 July 2024.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x