15 January 2025 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

NHPC Share Price | NHPC स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई

NHPC Share Price

NHPC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने शॉर्ट टर्मसाठी गुंतवणुकीसाठी एनएचपीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीला नवरत्न दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. ( एनएचपीसी कंपनी अंश )

मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 240 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 2.98 टक्के वाढीसह 116.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ICICI Direct फर्मने एनएचपीसी स्टॉक 3 महिन्यांसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 132 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तसेच गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 102 रुपयेचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

12 जुलै रोजी एनएचपीसी कंपनीचे शेअर 0.92 टक्क्यांच्या घसरणीसह 113 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीवरून 17 टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या मते, बीएसई पॉवर इंडेक्स मजबूत ब्रेकआउटनंतर स्ट्रक्चरल अपट्रेंडमध्ये वाढत आहे. टेक्निकल चार्टवर एनएचपीसी स्टॉक कप अँड हँडल फॉर्मेशनमधून बाहेर पडताना पाहायला मिळत आहे. शेअरची किंमत सध्या 50 दिवसांच्या EMA च्या वर गेली आहे. संरचनात्मकदृष्ट्या एनएचपीसी स्टॉक 6 महिन्यांच्या चार्टवर कप आणि हँडल पॅटर्न तयार करत आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत या स्टॉकमध्ये स्ट्रक्चरल अपट्रेंड पाहायला मिळू शकतो.

एनएचपीसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 117.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 44.87 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,13,508.89 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात एनएचपीसी स्टॉक तब्बल 9 टक्के वाढला आहे. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्के मजबूत झाली आहे. मागील एका महिन्यात एनएचपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 3 महिन्यांत एनएचपीसी स्टॉक 22 टक्के आणि 6 महिन्यांत 63 टक्के वाढला आहे. 2024 या वर्षात शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. मागील एका वर्षात एनएचपीसी स्टॉक 140 टक्के आणि 2 वर्षात 242 टक्के वाढला आहे. जर तुम्ही एनएचपीसी कंपनीच्या शेअर्सची मागील 3 वर्षाची कामगिरी पहिली तर तुम्हाला समजेल की या स्टॉकने लोकांना 335 टक्के नफा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NHPC Share Price NSE Live 15 July 2024.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x