25 April 2025 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

NHPC Share Price | NHPC शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, 351% परतावा देणारा स्टॉक तेजीत येणार

NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात व्यवहार करत होते. मात्र शुक्रवारी हा स्टॉक तुफान तेजीत वाढला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले होते. ( एनएचपीसी कंपनी अंश )

मागील 7 पैकी 6 ट्रेडिंग सेशनमध्ये हा PSU स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत होता. गुरुवारी एनएचपीसी स्टॉक 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह 101.96 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी हा सरकारी स्टॉक 2.54 टक्के वाढीसह 104.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

15 जुलै रोजी एनएचपीसी स्टॉक 118.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. त्यानंतर बजेट सेशनपासून शेअरमध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली होती. सध्या एनएचपीसी स्टॉक आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 9-10 टक्क्यांनी खाली आला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 92-93 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तसेच पुढील काळात हा स्टॉक 112-115 रुपयेपर्यंत वाढू शकतो. एनएचपीसी लिमिटेड ही कंपनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी मिनीरत्न-1 दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकाम आणि ऑपरेशन कामात गुंतलेली आहे.

एनएचपीसी ही कंपनी BSE-200 इंडेक्सचा भाग आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 22 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक आतापर्यंत 53 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात एनएचपीसी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 103 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत एनएचपीसी स्टॉक 209 टक्के आणि 5 वर्षांत 351 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,02,409.13 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NHPC Share Price NSE Live 27 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony