24 April 2025 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 25 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | इरेडा शेअरबाबत महत्वाचे संकेत; मल्टिबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Zomato Share Price | झोमॅटो शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मिळेल 30% परतावा - NSE: ETERNAL GTL Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, नेमकं कारण काय? 8 टक्क्यांची उसळी - NSE: GTLINFRA RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होईल, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: RVNL IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

Nirmitee Robotics India Share Price | काय चाललंय काय? या शेअरने 5 दिवसात 58% परतावा दिला, आता रोज 20-10% वाढतोय स्टॉक

Nirmitee Robotics India Share Price

Nirmitee Robotics India Share Price | ‘निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्सनी सलग दोन दिवस 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ‘निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 129.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अपर सर्किट हिट केला होता, आणि मंगळवारी देखील शेअर 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. आज मात्र शेअर मध्ये 10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nirmitee Robotics India Share Price | Nirmitee Robotics India Stock Price | BSE 543194)

शेअरमधील उलाढाल :
मागील एका आठवड्यात ‘निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्सची किंमत 42.23 टक्क्यांनी वाढली आहे. तर 2023 या नवीन वर्षात ‘निर्मिती रोबोटिक्स इंडिया’ कंपनीच्या शेअरची किंमत 51.25 टक्क्यांनी वर गेली आहे. त्याच वेळी आज सेन्सेक्समध्ये 780 अंकांची घसरण पाहायला मिळाले आहे. सहा महिन्यांपूर्वी ज्या कोकणी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 68.52 टक्के वाढले आहे.

निर्मिती रोबोटिक्स इंडिया ही कंपनी ‘एअर डक्ट क्लीनिंग’ कंपनी महणून काम करते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 90.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 42.51 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 153.70 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 57.55 रुपये होती. या कंपनीच्या प्रमोटरकडे एकूण 70.81 टक्के भाग भांडवल आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे 29.19 टक्के भाग भांडवल आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 4.16 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, तर कंपनीने 0.33 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nirmitee Robotics India Share Price 543194 stock market live on 25 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nirmitee Robotics India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या