20 November 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 1 कोटी - BOM: 530305 Home Loan | पगारदारांनो, 25 ऐवजी 13 वर्षांत फेडाल गृहकर्ज; पहा झटपट लोन फेडण्याचा सुपर फॉर्म्युला, पैसा वाचवा - Marathi News NMDC Share Price | मल्टिबॅगर शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर चार्टवर 'ओव्हरसोल्ड', तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स GMP IPO | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधीचा फायदा घ्या - IPO GMP FD Interest Rate | स्वतःच्या नाही तर पत्नीच्या नावाने सुरू करा FD; पैसे वाचतील, टीडीएसवर देखील मिळेल सूट - Marathi News
x

NMDC Share Price | मल्टिबॅगर शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC

NMDC Share Price

NMDC Share Price | केंद्र सरकारची एनएमडीसी लिमिटेड कंपनी गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 फ्री बोनस शेअर्स (NSE: NMDC) देणार आहे. एनएमडीसी लिमिटेड कंपनी १६ वर्षांनंतर पहिल्यांदा बोनस शेअर देणार आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये शेअर तेजीत राहील असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. अँटिक स्टॉक ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी शेअरसाठी २९४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. (एनएमडीसी कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी एनएमडीसी शेअर 1.06 टक्के घसरून 220.34 रुपयांवर पोहोचला होता. एनएमडीसीचा कंपनीचे एकूण मार्केट कॅप 64,831 कोटी रुपये आहे. एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी आणि नीचांकी स्तर अनुक्रमे २८६.३५ रुपये आणि १६७.३० रुपये आहे.

एनएमडीसी बोनस शेअर्स

एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांना २:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत एनएमडीसी कंपनीचा एक शेअर असलेल्या गुंतवणूकदारांना दोन अतिरिक्त शेअर्स मिळतील. एनएमडीसी लिमिटेड कंपनीने मे २००८ मध्ये २:१ या प्रमाणात गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले होते.

दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल

दुसऱ्या तिमाहीत एनएमडीसी लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १६.६६ टक्क्यांनी वाढून १,१९५.६३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एनएमडीसी कंपनीला 1,024.86 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत एनएमडीसी कंपनीचे एकूण उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढून 5,279.68 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NMDC Share Price 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NMDC Share price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x