17 April 2025 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL
x

NMDC Share Price | PSU शेअर देणार 32% परतावा, टेक्निकल चार्टवर संकेत, कमाईची संधी सोडू नका

NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. एनएमडीसी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक कंपनी आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने एनएमडीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, एनएमडीसी कंपनीने आर्थिक वर्ष 2030 पर्यंत 100 MT पर्यंत लोहखनिज उत्पादन वाढीचे लक्ष्य निश्चित केले आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 1.45 टक्के वाढीसह 249.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ICICI Direct फर्मने एनएमडीसी स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 325 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 28 जून 2024 रोजी एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 246 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, एनएमडीसी स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 32 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

मागील एका वर्षात एनएमडीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत हा स्टॉक 20 टक्के आणि 3 महिन्यांत 22 टक्के वाढला आहे. एनएमडीसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 286.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 104.15 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 72,342 कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज हाऊसच्या मते, एनएमडीसी कंपनीकडे उत्पादन व्हॉल्यूम वाढीसाठी प्रचंड वाव आहे. कारण स्टीलचा वापर अजूनही कमी आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पोलाद खरेदी करणारा देश असूनही, भारताचा दरडोई स्टीलचा वापर प्रति व्यक्ती 77 किलो आहे. हे जागतिक सरासरी 244 किलो प्रति व्यक्ती या पातळीपेक्षा प्रचंड कमी आहे.

एनएमडीसी कंपनीने 2030-31 पर्यंत 160 किलो दरडोई वापराचे लक्ष्य निश्चित केले आहे. एनएमडीसी कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 50 मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. एनएमडीसी स्टॉकबाबत ब्रोकरेज फर्मचा दृष्टिकोन सकारात्मक पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price NSE Live 01 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NMDC Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या