17 April 2025 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

NMDC Share Price | हा PSU शेअर कमाल करणार, शॉर्ट टर्म मध्ये देणार मोठा परतावा, स्टॉक चार्टवर संकेत

NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 154 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. या कंपनीने नुकताच 2030 पर्यंत लोह खनिज उत्पादन क्षमता 100 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. ( नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )

शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 1.30 टक्के घसरणीसह 269.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ब्रोकरेज कंपन्या एनएमडीसी स्टॉक खरेदीबाबत सकारात्मक पाहायला मिळत आहेत. नुवामा फर्मने आपल्या अहवालात ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या लिलावात लोहखनिज पावडरच्या बोलीत घट झाल्याची माहिती दिली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत बोलीच्या किमती प्रति टन 1000 रुपयेने घटली आहे. नुवामा फर्मच्या मते, पुढील फेरीत एनएमडीसी कंपनीला किंमती कमी कराव्या लागतील. जुलै 2024 मधील डिलिव्हरीसाठी लोहखनिज लिलाव पुढील आठवड्यात होणे अपेक्षित आहे.

ब्रोकरेज फर्म InCred च्या मते, एनएमडीसी स्टॉक पुढील 12 महिन्यात 319 रुपये किमतीवर जाऊ शकतो. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही कंपनी भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणारी नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारतातील लोहखनिजाचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

एनएमडीसी या कंपनीकडे छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये उच्च यांत्रिक लोह खनिज खाणींची मालकी आहे. या कंपनीचे कार्यालय हैदराबाद मध्ये आहे. ही कंपनी छत्तीसगडमधील बैलाडिला सेक्टर आणि कर्नाटकातील बेल्लारी-होस्पेट भागातील डोनिमलाई या प्रमुख लोह उत्पादक युनिटमधून 40 एमटीपीए पेक्षा जास्त लोहखनिजाचे उत्पादन घेते. एनएमडीसी कंपनीने 2023 पर्यंत 100 MNT लोहखनिज उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price NSE Live 22 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NMDC Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या