25 April 2025 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

NMDC Share Price | LIC ने एनएमडीसी कंपनीचे शेअर्स विकले, याचा कंपनीच्या स्टॉकवर काय परिणाम होणार? शेअरची कामगिरी तपासा

NMDC Share Price

NMDC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीने एनएमडीसी कंपनीमधील आपले 2 टक्के शेअर्स 649 कोटी रुपयांना खुल्या बाजारात विकले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी एलआयसीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, LIC ने एनएमडीसी कंपनीचे 6.06 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी 2.07 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकून 649 कोटी रुपये मिळवले आहेत.

LIC ने 14 मार्च ते 20 जून या कालावधीत ही विक्री केली आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 0.047 टक्के वाढीसह 106.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (NMDC Share Price NSE)

LIC ने एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 107.59 रुपये प्रति शेअर या किमतीवर विकले आहेत. ज्यातून LIC कंपनीला तब्बल 649 कोटी रुपये नफा मिळाला आहे. या शेअर विक्रीनंतर LIC ने एनएमडीसी मधील आपला वाटा 9.62 टक्केपर्यंत झाली आणला आहे. एनएमडीसी कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 चे तिमाही निकाल जाहीर केले होते. मार्च 2023 तिमाहीत एनएमडीसी कंपनीने 22 टक्क्यांच्या वाढीसह 2,276.94 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

एनएमडीसी कंपनीने स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, वित्तीय वर्ष 2022 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत एनएमडीसी कंपनीने 1,862.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 5,842.52 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न 7,117.89 कोटी रुपये नोंदवले गेले होते. एनएमडीसी कंपनीचा खर्च एका वर्षापूर्वी 4,197.73 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो कमी होऊन 3,794.18 रुपयेवर आला आहे.

2010 मध्ये एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 534 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरची किंमत 80 टक्के घसरली आणि स्टॉक आज 106 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात एनएमडीसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 3.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 8.64 टक्के घसरले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price today on 22 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NMDC Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony