19 November 2024 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

NMDC Steel Share Price | या स्टॉकची शेअर बाजारात शानदार एंट्री, स्टॉक तोडतोय अप्पर सर्किट, स्टॉकमध्ये पैसे लावावे?

NMDC Steel Share Price

NMDC Steel Share Price | 20 फेब्रुवारी 2023 रोजी ‘NMDC स्टील लिमिटेड’ या सरकारी कंपनीने डिमर्जनंतर जबरदस्त लिस्टिंग नोंदवली. एनएमडीसी स्टील ही सरकारी कंपनी सोमवारी बीएसई-एनएसई इंडेक्सवर पुन्हा सूचीबद्ध करण्यात आली आहे. या सरकारी कंपनीची लिस्टिंग 30.25 रुपये प्रति शेअर किमतीवर झाली. स्टॉक लिस्ट होताच अवघ्या काही तासात कंपनीच्या शेअर्सची खरेदी वाढली आणि स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहचला. लिस्टिंगच्या दिवशी बीएसई इंडेक्समध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31.75 रुपयांवर पोहोचली होती. मागील एका महिन्यात भारत सरकारने ‘NMDC स्टील लिमिटेड’ कंपनीच्या लिस्टिंगबाबत BSE कडून मंजुरी प्राप्त केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)

भारत सरकारने मागील वर्षी एनएमडीसी आणि एनएमडीसी स्टील लिमिटेड कंपनीचे विभाजन करण्याची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत रेकॉर्ड तारखेपर्यंत एनएमडीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदारांना 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरवर ‘एनएमडीसी स्टील’ कंपनीचा एक शेअर दिला जाणार असे ठरले होते. एनएमडीसीच्या मूळ कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारच्या ट्रेडिंग शेअरमध्ये एक टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी एनएमडीसी स्टील कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 33.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

या दोन्ही कंपन्यांच्या डिमर्जरनंतर छत्तीसगडमधील ‘नागरनार प्लांट’ चे नाव एनएमडीसी स्टील प्लांट असे ठेवण्यात आले आहे. एनएमडीसी स्टील कंपनीमध्ये सरकारची एकूण हिस्सेदारी 60.79 टक्के आहे. आज स्टॉक अपर सर्किट हीट करून 33.30 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9,304.67 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Steel Share Price NSLNISP stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

NMDC Steel Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x