Noida Toll Bridge Company Share Price | 7 रुपयाच्या पेनी स्टॉककडे सर्वांच्या नजरा, स्टॉक तेजीत येतोय, डिटेल्स पहा
Noida Toll Bridge Company Share Price | या आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळाली. अदानी समूहाचे शेअर्स ‘खतरों के खिलाडी’ सारखे वर-खाली करत आहेत, त्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अचानक अदानी शेअर्स जबरदस्त उसळी घेतात, तर कधी अचानक शेअर्समध्ये लोअर सर्किट लागतो. त्यामुळे बाजारातील गुंतवणुकदार प्रचंड मोठ्या गोंधळात अडकले आहेत. अशा काळात काही पेनी स्टॉक लोकांच्या नजरेत आले, ज्यामध्ये अल्पावधीत बरीच उलाढाल होत आहे. त्यापैकी एक स्टॉक म्हणजे, ‘नोएडा टोल ब्रिज लिमिटेड’. एकेकाळी या या कंपनीचे शेअर्स 73.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे आता 7.05 रुपये पर्यंत खाली आले आहेत. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के घसरणीसह 7.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Noida Toll Bridge Company Share Price | Noida Toll Bridge Company Stock Price | BSE 532481 | NSE NOIDATOLL)
शेअरची किंमत काय आहे :
2007 मध्ये ‘नोएडा टोल ब्रिज’ या कंपनीचे शेअर्स 73.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र नंतर स्टॉक सातत्याने पडत असल्याने शेअरची किंमत आता 7.05 रुपये पर्यंत खाली आली आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.70 रुपये किमतीवरून 7.75 रुपये किमतीवर पोहचले होते. एका दिवसात स्टॉकने 13.01 टक्के उसळी घेतली होती. या कंपनीचे मार्केट कॅप 144 कोटी रुपये आहे. 12 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. तर 3 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.56 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
स्टॉक चर्चेत असण्याचे कारण :
‘नोएडा टोल ब्रिज’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला संचालक मंडळाची बैठक आयोजित केल्याची बातमी दिली आहे. या कंपनीने सेबीला कळवले आहे की, 14 फेब्रुवारी 2023 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, आणि या बैठकीत 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल तपासले जाणार आहेत. याशिवाय कंपनी इनसाइडर ट्रेडिंग रोखण्यासाठी, कंपनीने सिक्युरिटीजमधील ट्रेडिंग विंडो चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Noida Toll Bridge Company Share Price 532481 NOIDATOLL stock market live on 11 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम