30 January 2025 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Novartis India Share Price | नोव्हार्टिस इंडिया शेअर्सवर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या

Novartis India Share Price

Novartis India Share Price | ‘नोव्हार्टिस इंडिया’ या फार्मा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनीने शुक्रवारी सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 47.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच 12 मे 2023 रोजी ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनीचे शेअर 0.52 टक्क्यांच्या घसरणीसह 669.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के वाढीसह 684.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लाभांश तपशील :
‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 47.50 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. सेबीला दिलेल्या माहिती ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनीने कळवले आहे की, कंपनी आपल्या 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 10 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश आणि 37.50 रुपये विशेष लाभांश वाटप करणार आहे.

‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 47.50 रुपये लाभांश देईल. कंपनी हा लाभांश 2 ऑगस्ट 2023 रोजी किंवा नंतर गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा करेल.

कंपनीची तिमाही कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीमध्ये ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनीने 76.13 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या मार्च 2022 तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 22.57 टक्के घट झाली आहे. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत ‘नोव्हार्टिस इंडिया’ कंपनीने 92.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 117.87 टक्के घट झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Novartis India Share Price today on 15 May 2023

हॅशटॅग्स

Novartis India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x