11 January 2025 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट
x

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर 200 रुपयांची पातळी गाठणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आपल्या आंध्र प्रदेशातील आगामी ग्रीन हायड्रोजन हबला वीज पुरवण्यासाठी 30,000 कोटी रुपयांचे ट्रान्समिशन नेटवर्क तयार करण्याची योजना (Gift Nifty Live) आखत आहे. या ट्रान्समिशन नेटवर्कची क्षमता २० गिगावॅट आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)

मात्र हे ट्रान्समिशन नेटवर्क नॅशनल पॉवर ग्रीडपासून वेगळे असेल. हे ट्रान्समिशन नेटवर्क सुरुवातीला अनंतपूरमधील कंपनीच्या प्रस्तावित सौर प्रकल्पाला पुडीमाडाका येथील भारताच्या पहिल्या हायड्रोजन हबशी जोडणार आहे. आंध्र प्रदेशातील १६०० एकरांवर उभारण्यात येणाऱ्या या हबमध्ये प्रतिदिन १५०० टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीकडून ठेवण्यात आले आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर 2.48 टक्के घसरून 144.60 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 155.35 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 111.50 रुपये होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 1,22,140 कोटी रुपये आहे.

चॉइस ब्रोकिंग फर्म – शेअर टार्गेट प्राइस

चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी १८० ते २०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. चॉइस ब्रोकिंग फर्मच्या मते, एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्स काही आठवड्यात किंवा महिन्यांत या टार्गेट प्राईसपर्यंत वाढण्याची अंदाज आहे.

आनंद राठी ब्रोकिंग फर्म – शेअर टार्गेट प्राइस

आनंद राठी ब्रोकिंग फर्मने एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी १६० रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस दिली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरला 142 रुपयांवर सपोर्ट आणि 155 रुपयांवर रेझिस्टन्स आहे असं म्हटलं आहे. या शेअरने १५५ रुपयांची पातळी ओलांडल्यास तो १६० रुपयांपर्यंत वाढू शकतो.

मेहता इक्विटीज ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राइस

मेहता इक्विटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मेहता इक्विटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी १७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price Friday 06 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x