NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनने मागवलेल्या निविदांसाठी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती.
१००० मेगावॅट क्षमतेचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
यूपीपीसीएलने दर-आधारित 2000 मेगावॅट आयएसटीएस कनेक्टेड सौर पीव्ही ऊर्जा प्रकल्पांसाठी 3 जानेवारी 2025 रोजी निविदा काढल्या होत्या. यामध्ये एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला १००० मेगावॅट क्षमतेचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. मात्र यूपीपीसीएल’कडून अद्याप वर्क ऑर्डर प्राप्त झालेली नाही.
सौर प्रकल्पाचा पहिला भाग कार्यान्वित
गेल्या आठवड्यात एनटीपीसी लिमिटेड कंपनीने माहिती देताना म्हटले होते की, ‘कंपनीने २०० मेगावॅट सौर प्रकल्पाचा पहिला भाग कार्यान्वित केला आहे. एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडकडे देखील हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामार्फत एनटीपीसी ग्रुपने आतापर्यंत ७६,५९८.१८ मेगावॅट क्षमतेची भर घातली आहे.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर 0.12 टक्क्यांनी वाढून 128.10 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या महिन्याभरात एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर जवळपास 9.21 टक्क्यांनी घसरला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 155.35 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 111.50 रुपये आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,08,000 कोटी रुपये आहे.
एनटीपीसी ग्रीन टार्गेट प्राईस
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरसाठी 134 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यानंतर हा शेअर १३९ रुपयांपर्यंत वाढू शकतो. मात्र, गुंतवणूकदारांना 120 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील मार्केट विश्लेषकांनी दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NTPC Green Share Price Saturday 04 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील