27 January 2025 1:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ होऊन तो ६५.६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने ५५.६१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. तसेच डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ होऊन तो ५८१.४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, मागील वर्षी याच तिमाहीत एकूण उत्पन्न ४६३.४६ कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या खर्चात वाढ होऊन ते ४८२.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एकूण खर्च ३८३.२८ कोटी रुपये होता.

सोमवारी शेअरवर नजर

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्याने या आठवड्यात शेअर्स फोकसमध्ये राहणार आहे. गेल्या एक महिन्यात हा शेअर 10.29 टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर 0.10 टक्क्यांनी घसरून 113.06 रुपयांवर पोहोचला आहे. 13 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरचा भाव 109.41 रुपये होता. तो किंमत शेअरची ५२ आठवड्यांचा नीचांकी पातळी होती.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचे संकेत

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषक रचित खंडेलवाल या शेअरबाबत म्हणाले की, ‘केंद्र सरकारने अक्षय ऊर्जेवर लक्ष केंद्रित केल्याने त्याचा फायदा एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला होऊ शकतो. मागील वर्षांत पॉवर शेअर्स सकारात्मक फायद्याचे ठरले आहेत. तसेच वीज क्षेत्रातील कंपन्या भविष्यात चांगली कामगिरी करतील असे संकेत दिसत आहेत. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीची कामगिरी सुधारेल आणि त्याचा थेट फायदा शेअरला होईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला

२४ जानेवारी रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, ‘एनटीपीसी कंपनीच्या उपकंपनीला एनएचपीसी कंपनीकडून ३०० मेगावॅटचा सौर प्रकल्प संबंधित कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. एनएचपीसी कंपनीच्या टेंडरसाठी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनी यशस्वी बोली लावणारी कंपनी ठरली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price Saturday 25 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x