5 February 2025 9:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | एनटीपीसी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर 4.52 टक्के घसरून 127 रुपयांवर पोहोचला होता. कारण, एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या भागधारकांचा एक महिन्याचा लॉक-इन कालावधी गुरुवारी संपला आहे. हा एक महिन्याचा लॉक-इन कालावधी संपल्याने 18.3 कोटी शेअर्स ट्रेडिंगसाठी फ्री असतील. मात्र लॉक-इन कालावधी संपल्याचा अर्थ असा नाही की हे सर्व शेअर्स खुल्या बाजारात विकले जातील, परंतु ते केवळ ट्रेड करण्यास पात्र ठरतील.

नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चने काय म्हटले

नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चने याबाबत म्हटले आहे की, ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भागधारकांसाठी ३ महिन्यांचा लॉक-इन कालावधी 24 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर बीएसईवर सकाळी १३०.१५ रुपयांवर उघडला आणि नंतर तो १२५.८५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,06,930 कोटी रुपये आहे.

कंपनी शेअर नोव्हेंबरमध्ये सूचिबद्ध झाला होता

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा १०,००० कोटी रुपयांचा आयपीओ नोव्हेंबर २०२४ मध्ये लाँच करण्यात आला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ २.५५ पट सबस्क्राईब झाला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर २७ नोव्हेंबर २०२४ रोजी बीएसई, एनएसईवर सूचिबद्ध करण्यात आला होता. शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या दिवशी गुंतवणूकदारांना ३ टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता. बीएसईवर आतापर्यंत एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरने १५५.३० रुपयांचा विक्रमी उच्चांक पाहिला आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीबद्दल

एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचा पोर्टफोलिओ विकसित करते. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीची ऑपरेटिंग क्षमता आणि वीज निर्मितीच्या दृष्टीने ही कंपनी सर्वात मोठी अक्षय ऊर्जा पीएसयू (हायड्रो वगळून) आहे. जून २०२४ पर्यंत एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये १४,६९६ मेगावॅट प्रकल्पांचा समावेश होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price Thursday 26 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x