25 December 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | नकारात्मक जागतिक संकेतांमुळे मंगळवारी स्टॉक मार्केट घसरला होता. मंगळवारच्या ट्रेडिंगच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक तेजीत होते, पण काही वेळाने खाली घसरल्याचे (NSE: NTPC) पाहायला मिळाले. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.02 टक्के घसरून 420.65 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी NTPC शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.14 टक्के घसरून 406.85 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक
एनटीपीसी लिमिटेड कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या फाइलिंगनुसार, “एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी 24 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दुसऱ्या तिमाही निकालांबाबत विचार करणे, मंजूर करणे आणि रेकॉर्डवर घेणे असे निर्णय घेतले जातील. याच बैठकीत अंतरिम लाभांशाचाही विचार केला जाऊ शकतो, असं कंपनीने म्हटलं आहे.

एनटीपीसी शेअर्सची कामगिरी
मागील ६ महिन्यात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 22.76% परतावा दिला आहे. तसेच मागील १ वर्षात या शेअरने 77% परतावा दिला आहे. तर मागील ५ वर्षात या शेअरने 255% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 35% परतावा दिला आहे.

एनटीपीसी बोनस शेअर इतिहास
एनटीपीसी लिमिटेड कंपनीने 19 मार्च 2019 मध्ये फ्री बोनस शेअर दिले होते. एनटीपीसी लिमिटेड कंपनीने जाहीर केलेला शेवटचा बोनस 19 मार्च 2019 च्या एक्स-डेटसह 1:5 च्या प्रमाणात होता. म्हणजेच एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांना २०१९ मध्ये प्रत्येक ५ शेअर्समागे १ बोनस शेअर दिला होता.

NTPC शेअरसाठी BUY रेटिंग
एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी तज्ज्ञांनी BUY रेटिंग दिली आहे. २१ स्टॉक मार्केट तज्ज्ञांपैकी १० तज्ज्ञांनी NTPC शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

अरिहंत कॅपिटल ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
अरिहंत कॅपिटल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले की, NTPC दैनंदिन चार्टवर सकारात्मक संकेत दिसत आहेत. अरिहंत कॅपिटल ब्रोकरेज फर्म तज्ज्ञांच्या मते NTPC शेअरला ४२५ ते ४२० रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. NTPC शेअरचा मोमेंटम इंडिकेटर सकारात्मक स्थितीत असलेल्या बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार येत्या काही आठवड्यांत ४७० ते ४९० रुपये टार्गेट प्राईससाठी गुंतवणूक करू शकतात. तसेच ४१० रुपये स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x