19 April 2025 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल

NTPC Share Price

NTPC Share Price | सध्या भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. भारतातील लोकसभा निवडणुकीचा कल कोणाच्या बाजूने आहेत हे सांगणं अवघड आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने सौरऊर्जेच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तज्ञांच्या मते, भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 4 पॉवर स्टॉक निवडले आहेत.

टाटा पॉवर :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 88 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 449 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एनटीपीसी :
एनटीपीसी ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीकडे सध्या 51 पॉवर स्टेशन्स असून त्यात 15 सोलर पीव्ही प्लांट आहेत. तसेच या कंपनीकडे 42 इतर जॉइंट व्हेंचर पॉवर स्टेशन्स आणि 16 सोलर पीव्हीसह सहाय्यक कंपन्या आहेत. या कंपनीची 2032 पर्यंत स्थापित क्षमता 130 GW पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मागील वर्षी या कंपनीने 21.16 अब्ज डॉलर्स उत्पन्न कमावले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.52 लाख कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 363.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अदानी ग्रीन एनर्जी :
सध्या या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने कंपनीचे कर्ज-ते-इक्विटी गुणोत्तर 45 वरून 9.0 च्या खाली आणले आहे. मागील वर्षी या कंपनीच्या वीज विक्रीमध्ये 52 टक्के वाढ झाली होती. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीचा निव्वळ नफा दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 1,797 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जेएसडब्ल्यू एनर्जी :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सौरऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणार हा स्टॉक टॉप सोलर एनर्जी स्टॉक मानला जातो. महाराष्ट्रात या कंपनीची स्थापित वीज निर्मिती क्षमता 6,677 MW आहे. कंपनीची सौरऊर्जा स्थापित क्षमता 667 MW आहे. मार्च तिमाहीमध्ये या कंपनीने महसुलात वार्षिक 13 टक्के आणि निव्वळ नफ्यात 28 टक्के वाढ नोंदवली आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.43 टक्के वाढीसह 630 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 01 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या