26 January 2025 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

NTPC Share Price | सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तुफान तेजीत येणार, सरकारकडून झाली फायद्याची घोषणा

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने एनटीपीसी कंपनीच्या उत्तर करनपुरा अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या युनिट-1 ला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर एनटीपीसी कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. ( एनटीपीसी कंपनी अंश )

आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. एनटीपीसी या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,33,032 कोटी आहेत. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 354.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एनटीपीसी कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, उत्तर करनपुरा अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या युनिट-1 चे बांधकाम 7,526 कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. या युनिट-1 ची वीज उत्पादन क्षमता 660 मेगावॅट आहे. झारखंडच्या चतरा जिल्ह्यात असलेल्या उत्तर करनपुरा अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्टची एकूण वीज उत्पादन क्षमता 1980 MW आहे. त्यात 660 MW क्षमतेचे तीन युनिट उभारले जाणार आहेत.

उत्तर करनपुरा अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्टमधून निर्माण होणारी वीज झारखंड, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्याला पुरवली जाणार आहे. यामुळे भारतातील पूर्व भागात परवडणाऱ्या दरात विजेची उपलब्धता सुनिश्चित होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रस्ते, ड्रेनेज, दळणवळण व वाहतूक सुविधा आदींचा देखील विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे.

एनटीपीसी कंपनीने नुकताच आपल्या बंदिस्त खाणींमधून 100 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. NTPC कंपनीची उपकंपनी असलेल्या NTPC Mining Limited कंपनीने 1 जानेवारी 2017 रोजी त्यांच्या पहिली कोळसा खाण पाकरी बरवाडीहमधून कोळसा उत्पादन सुरू केल्यापासून 100 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कोळशाचे उत्पादन केले आहे.

NTPC कंपनीच्या मते, 19 जून 2022 रोजी कंपनीने 50 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा टप्पा अवघ्या 1,995 दिवसांत पार केला होता. तर पुढील 50 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा टप्पा कंपनीने केवळ 617 दिवसांत पार केला आहे. एनटीपीसी मायनिंग लिमिटेड कंपनीकडे पाच खाजगी कार्यरत कोळसा खाणीची मालकी आहे. यामध्ये झारखंड राज्यातील पाकरी बरवाडीह, चट्टी बरियातू, केरंदरी कोळसा खाणी, ओडिशातील दुलेगा कोळसा खाण, छत्तीसगडमधील तलाईपल्ली कोळसा खाण सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 04 March 2024.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x