19 September 2024 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

NTPC Share Price | PSU स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार, स्टॉक चार्टने दिले संकेत, खरेदीसाठी गर्दी

NTPC Share Price

NTPC Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी कंपनीने मागील 5 वर्षांत कोळशावर आधारित वीजनिर्मिती क्षमता वाढवली आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )

ब्रोकरेज हाऊस ICICI Direct च्या मते, एनटीपीसी स्टॉक पुढील 12 महिन्यांत 455 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 28 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 365 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 25 टक्क्यांनी वाढू शकतो. मागील एका वर्षात एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 या वर्षात एनटीपीसी स्टॉक 18 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 110 टक्के वाढ झाली आहे. पुढील काजात हा स्टॉक आणखी 25 टक्क्यांनी वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 0.97 टक्के घसरणीसह 361.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एनटीपीसी ही भारतातील एकमेव कंपनी आहे जिने, मागील 5 वर्षात आपली कोळशावर आधारित वीज निर्मिती क्षमता 73000 MW वर नेली आहे. एनटीपीसी कंपनीकडे 9300 मेगावॅट क्षमतेचे कोळसा आधारित वीज निर्मिती प्रकल्प निर्माणाधीन आहेत. एनटीपीसी कंपनीचे लक्ष अक्षय उर्जेवर देखील आहे. यामध्ये ग्रीन हायड्रोजनचाही समावेश होतो. एनटीपीसी कंपनीने 2032 पर्यंत आपल्या एकूण क्षमतेच्या 45-50 टक्के वीज निर्मिती गैर-जीवाश्म इंधनापासून करण्याचे निर्धारित केले आहे. 2032 पर्यंत एनटीपीसी कंपनीने 60 GW अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य ठरवले आहे.

एनटीपीसी कंपनीकडे 3300 मेगावॅट नूतनीकरणक्षम वीज निर्मिती क्षमता आहे. या कंपनीचे 11,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प अजूनही प्रलंबित आहे. याशिवाय एनटीपीसी कंपनी ग्रीन हायड्रोजन, न्यूक्लियर पॉवर क्षेत्रात देखील काम करत आहे. या कंपनीच्या थर्मल पॉवर पोर्टफोलिओतील रेग्युलेटेड इक्विटीमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2024-26 पर्यंत एनटीपीसी कंपनीचा निव्वळ नफा 26 टक्के CAGR ने वाढू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 30 May 2024.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x