23 February 2025 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Stock in Focus | या कंपनीचे शेअर्स तब्बल 74 टक्के स्वस्त झाले, इतका स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार?

Stock In Focus

Stock in Focus | शेअर बाजारात शाश्वत काहीच नाही. जी कंपनी आज चांगली कामगिरी करत आहे, ती उद्य खराब कामगिरी करू शकते. अनेक मोठ्या कंपन्यांना कधी कधी घसरणीचा सामना करावा लागू शकतो. अशीच एक कंपनी आहे, जिचे नाव आहे, “नुरेका लिमिटेड”. या कंपनीची अवस्था फार बिकट झाली आहे. शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी तेजी सुसाट धावत आहे, असे असले तरी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. 2022 मध्ये आतापर्यंत नुरेका कंपनीच्या शेअरमध्ये 73.57 टक्क्यांची जबरदस्त पडझड पहायला मिळाली आहे. कंपनीच्या अशा कठीण काळात एका प्रवर्तकाने कंपनीतील आपली गुंतवणूक हिस्सेदारी काही प्रमाणात कमी केली आहे.

नुरेकाचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमधे आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 2.48 टक्क्यांच्या कमजोरीसह 524 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर नुरेका कंपनीचे शेअर्स 536 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मागील 6 दिवसात या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 17.69 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, नुरेका कंपनीच्या शेअरची किमत 32.18 टक्क्यांनी गडगडली होती. त्याचवेळी मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमत 64.16 टक्के खाली आली आहे.

नुरेका कंपनीच्या प्रमोटर पायल गोयल यांनी कंपनीच्या अशा कठीण काळात आपला गुंतवणूक हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. बल्क डील अंतर्गत पायल गोयल यांनी 28 नोव्हेंबर 2022 रोजी आपले शेअर्स विकले आहेत. NSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार पायल गोयल यांनी आपले 55,863 शेअर्स 546.04 रुपये प्रति शेअर किमतीवर खुल्या बाजारात विकले आहेत. म्हणजेच कंपनीच्या प्रवर्तक पायल गुप्ता यांनी या डीलमधून 3.05 कोटी रुपये नफा कमावला आहे. बीएसई निर्देशांकावर नुरेका कंपनीचे बाजार भांडवल कमी होऊन आता 531.01 कोटी रुपयांवर आले आहे.

Nureka Stock Price
सप्टेंबर 2022 च्या तिमाहीपर्यंत पायल गुप्ता यांच्याकडे कंपनीचे एकूण 35 टक्के शेअर्स होते. दुसऱ्या तिमाहीपर्यंत नुरेका कंपनीच्या पाच प्रमोटर्सनी या कंपनीचे एकूण 69.99 लाख शेअर्स म्हणजेच 70 टक्के शेअर्स धारण केले आहे. तर कंपनीचे 30 टक्के म्हणजेच जवळपास 3 लाख शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांनी होल्ड केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत या कंपनीचे प्रदर्शन फार निराशाजनक होते. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीला 2.89 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 5.43 कोटी रुपये नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nureka Share price is in Focus after Payal Goyal decided to sell Stocks in bulk on 01 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x