19 November 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Nykaa Share Price | नायकाच्या शेअर्समध्ये गडगडाट सुरूच, गुंतवणूकदार हैराण, शेअरमध्ये पुढे काय करावे?

Nykaa Share Price

Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर्सममधील घसरण थांबायच नाव घेत नाही आहे. या स्टॉक मधील ही घसरण कुठे थांबेल देवाला माहीत! गुंतवणूकदार या स्टॉकमुळे पूर्ण हैराण झाले आहेत. अनेकांनी तर पैसे परत मिळण्याची अपेक्षा करणे देखील सोडून दिले आहे. या कंपनीनेही शेअरमधील घसरण थांबवण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले, परंतु शेअर मधील घसरण काही थांबेना. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. आणि आज मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 5.50 टक्के घसरणीसह 132.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 148.30 रुपयांवर ओपन झाला होता, तर आणि हळूहळू शेअरची किंमत 140 रुपयांवर घसरली. आज शेअरची किंमत 132 रुपयेवर आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)

मागील तीन महिन्यांत शेअरमध्ये घट :
नायका नावाने व्यापार करणाऱ्या FSN ECommerce Ventures या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील आठवड्यात मोठी ब्लॉक डील संपन्न झाली होती. त्यानंतर शेअरची किंमत झपाट्याने पडू लागली. नायका कंपनीचे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांपेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 59 टक्क्यानी पडली आहे.

नायका कंपनीच्या प्री-आयपीओ गुंतवणूकदारांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी लॉक-इन कालावधी संपल्यानंतर शेअरची विक्री केली आणि कंपनीतून ते बाहेर पडले. Lighthouse India कंपनीने नायकाचे 336 कोटी रुपयांचे 1.84 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले. क्रॅव्हिस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स कंपनीने नायका कंपनीचे 630 कोटी रुपयांचे 3.60 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले. आणि टीपीजी कंपनी देखील 998 कोटी रुपयांचे 5.43 कोटी शेअर्स विकून टाकले. त्यानंतर स्टॉकमध्ये जी पडझड सुरू झाली, ती अजून थांबत नाही आहे.

कंपनीचे गुंतवणूकदारांमध्ये नाराज :
ऑक्टोबर 2022 मध्ये नायका कंपनीने लॉक-इन कालावधी संपण्यापूर्वी आपल्या प्री-IPO गुंतवणूकदारांना बोनस वाटप करण्याची घोषणा केली होती. आणि कंपनीने स्टॉक 1:5 स्टॉक स्प्लिटची देखील घोषणा केली होती. मात्र कंपनीची ही युक्ती कामी आली नाही. नायका कंपनीचे शेअर्स 348 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 140 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यादरम्यान, स्टॉकची किंमत 64 टक्क्यांनी पडल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price 543384 in focus check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x