22 November 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

Nykaa Share Price | अबब! नायका शेअरची किंमत 60% खाली आली, एक डील आणि मॅनेजमेंट बदल, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Nykaa Share price

Nykaa Share Price | नायका या सौंदर्य प्रसाधन ब्रँडचे पालक कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये आज सकाळी जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. शेअर सध्या 2.87 टक्के कमजोरीसह 147.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नायका कंपनीचे शेअर्स आज 2 टक्के घसरून सर्वकालीन नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. नायका या ब्युटी ई-रिटेल कंपनीचा स्टॉक आज दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी 147.15 रुपये किमतीवर पडले आहेत. S&P BSE सेन्सेक्स निर्देशांक 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 60,829.76 अंकावर ट्रेड करत आहे.

स्टॉकवर डिलचा नकारात्मक प्रभाव :
Kravis Investment Partners कंपनीने नायका कंपनीचे 36.7 दशलक्ष शेअर्स 171 रुपये प्रति शेअर या दराने खुल्या बाजारात विकून टाकले, परिणामस्वरूप मागील आठवड्यात नायका कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के खाली आली होती. BSE इंडेक्स डेटानुसार गुरुवार दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी FPI आणि DII गटातील मोठ्या गुंतवणूकदारांनी नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बीएसई वेबसाईटवर उपलब्ध ब्लॉक डील डेटानुसार गोल्डमन सॅक्स, मिरे अॅसेट म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड या दिग्गज संस्थानी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

सीएफओ चा राजीनामा :
मागील महिन्यात नायका कंपनीचे सीएफओ अरविंद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी खाली आले होते. नायकाने 22 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, CFO अग्रवाल यांनी 25 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी खाजगी इक्विटी फर्म लाइटहाउस इंडियाने ब्लॉक डीलद्वारे नायका कंपनीचे 18.44 दशलक्ष इक्विटी शेअर्स 336 कोटी रुपयेसाठी खुल्या बाजरात विकले होते. कंपनीचा ब्लॉक डेटा दर्शवितो की नायका कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी करणाऱ्या संस्थेत आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, अॅक्सिस म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि BofA सिक्युरिटीज सारखे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार, BNP पारिबस आर्बिट्रेज आणि Societe Generale यासारख्या दिग्गज संस्था सामील होत्या.

नायका कंपनीचा IPO मागील वर्षी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि स्टॉक नोव्हेंबरमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. 26 नोव्हेंबर 2021 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 429 रुपयांच्या या विक्रमी उच्चांकावर ट्रेड करत होते, मात्र आता शेअरची किंमत 64 टक्क्यांनी खाली आली आहे. नायका कंपनी भारतातील अग्रणी लाईफस्टाईल फोकस्ड आणि सौंदर्य प्रसाधन विकणारी ऑनलाईन कंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share price has fallen down after management changed check details on 23 December 2022.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x