22 November 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Nykaa Share Price | नायकाचा शेअर 60 टक्के पेक्षा जास्त घसरला, गुंतवणुकदार टेन्शनमध्ये का आले? तज्ज्ञ काय सांगतात?

Nykaa Share price

Nykaa Share Price | नायका कंपनीचे शेअर्स दिवसेंदिवस नवीन नीचांक पातळी गाठत आहे. शुक्रवार 28 ऑक्टोबर 2022 रोजी नायका ई-कॉमर्स कंपनीचे शेअर्स 6 टक्के पेक्षा अधिक पडले आणि, 1000 रुपयेच्या खाली ट्रेड करत होते. नायका कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. ट्रेडिंग सेशनदरम्यान नायका कंपनीचे शेअर्स 975.50 रुपये या आपल्या नवीन नीचांकी किंमत पातळीवर आले होते. नायका कंपनीचे शेअर्स IPO लिस्टिंगमध्ये 1125 रुपयेच्या इश्यू किमतीवर वाटप करण्यात आले होते. नायका कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये 80 टक्के पेक्षा अधिक प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

शेअर्सची किंमत घसरली :
52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून नायका कंपनीचे शेअर्स 60 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाले आहेत. नायका कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 60 टक्के पेक्षा जास्त पडले आहेत. 26 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE वर 2574 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नायका कंपनीचे शेअर्स 28 ऑक्टोबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर 6 टक्के पेक्षा अधिक पडले आणि 981 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नायका कंपनीचे शेअर्स मागील 5 दिवसात 15 टक्के पेक्षा अधिक पडले होते. नायका कंपनीच्या प्री-IPO गुंतवणूकदारांसाठी निर्धारित केलेला लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण होईल. JM फायनान्शियलला असा अंदाज आहे की, मासिक एक्सपायरी तारखेला 319 दशलक्ष शेअर्स ट्रेडिंगसाठी खुले केले जातील.

1 शेअरवर 5 बोनस शेअर्स :
नायका कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स भेट म्हणून देणार आहे. नायका कंपनी आपल्या शेअर धारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 1 शेअरवर कंपनी 5 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. नायका कंपनीने बोनस शेअर्स वितरण करण्यासाठी 3 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. जर तुम्ही मागील एका वर्षातील नायकाच्या शेअर्सचे चार्ट पॅटर्न पाहिले तर कंपनीचे शेअर्स 58 टक्के पेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. त्याच वेळी, नायका कंपनीचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 54 टक्के पडले आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी, नायका कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2086.25 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 ऑक्टोबर 2022 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 981 रुपयांपर्यंत पडले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share price has Fallen on Lowest Treading price of Lifetime on 29 October 2022.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x