22 November 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Nykaa Share Price | नायकाचे शेअर्स 11 टक्क्यांच्या घसरणीसह नवीन नीचांकावर, स्टॉक होल्ड करावा की बाहेर पडावे?

Nykaa Share price

Nykaa Share Price| मागील वर्षी शेअर बाजारात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन ब्रँड आणि ग्रूमिंग प्रॉडक्ट कंपनी नायकाचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. सध्या या कंपनीचा स्टॉक आपल्या सर्वकालीन नीचांकी किमतीवर पोहोचले आहेत. मागील 15 दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांच्या घसरणीसह 1134 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअरची IPO मध्ये इश्यू किंमत 1125 रुपये होती.

हा स्टॉक मागील वर्षी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. सुरुवातीला या स्टॉकला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. लिस्टिंगच्या दिवशीच हा शेअर 2248 या आपल्या इश्यू किमतीच्या दुप्पट किमतीवर पोहोचला होता. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2574 रुपये आहे. जेव्हा भारतीय शेअर बाजारात तेजीत होता आणि सेन्सेक्स 62 हजारांवर ट्रेड करत होता, त्यावेळी नायकाचा शेअर सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला होता. नंतर शेअर बाजार कोसळला आणि या स्टॉकची स्थितीही कमजोर झाली. आता हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 56 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?
ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की या शेअरमध्ये पुढील काळात वाढ होऊ शकते. ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की नायका कंपनीने फॅशन वर्टिकलच्या बळावर वेगाने वाढणाऱ्या फॅशन व्यवसायात गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे. स्टॉक मार्केट तज्ञांनी हे स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तज्ञांनी स्टॉकची लक्ष किंमत 1250 रुपये निश्चित केली आहे. JM फायनान्शिअलने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, या कंपनीचे लक्ष आता EB2B सारख्या उपक्रमांवर असून ज्यात पुढील 3-5 वर्षांत चांगल्या संधी निर्माण होणार आहेत. तथापि, ग्रीनएज वेल्थने नायका चे मूल्यांकन अजूनही त्याच्या विक्रीच्या 10 पट आहे, असे म्हंटले आहे. जर तुम्ही जोखीम घेऊ शकत असाल तर हा स्टॉक फक्त डाउनट्रेंडमध्येच खरेदी करा.

बोनसनंतरही ही घसरण
नायका कंपनीच्या शेअर धारकांना नुकताच 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर झाले आहेत. कंपनी 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत करेल. मात्र, इतक्या मोठ्या बोनस शेअर्सच्या घोषणेनंतरही शेअर्समधील घसरण थांबलेली नाही. नायकाने 3 ऑक्टोबर 2022 रोजी बोनस शेअर्सची घोषणा केली होती, तेव्हापासून स्टॉक 11 टक्क्यांनी पडला आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात
FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स म्हणजेच नायका कंपनी फॅशन प्रॉडक्ट चे उत्पादन आणि विक्री करते. त्याच्या स्वतःच्या ब्रँड नावाखाली अनेक उत्पादने निर्माण केली जातात. कंपनीची आर्थिक स्थिती सध्या बिघडली आहे. कंपनीचा निव्वळ नफा जानेवारी-मार्च 2022 मध्ये 48.66 कोटींनी घसरला होता. तर एप्रिल-जून 2022 मध्ये कंपनीचा नफा 9.05 कोटींनी घसरला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share price is falling down even after declaring Bonus shares on 20 October 2022.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x