5 November 2024 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Nykaa Share Price | नायका शेअर्स खरेदीसाठी मोठी झुंबड, टार्गेट प्राईस जाहीर, का खरेदी वाढली पहा

Nykaa Share Price

Nykaa Share Price | नायका कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून कमजोर झाले आहेत. या स्टॉक मध्ये खूप मोठी घसरण पाहायला मिळाली होती. नायका कंपनीचे शेअर्स आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 62 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. प्री-IPO मध्ये ज्या लोकांनी नायका कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती त्यांचा लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 संपणार आहे. अशा स्थितीत नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला आहे. तथापि, नायका कंपनीच्या तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक दिसत आहे. नायका कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Nykaa कंपनीचे तिमाही निकाल :
जुलै-सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत नायका कंपनीच्या निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत नायका कंपनीने 5.19 कोटी रुपयेचा निव्वळ नफा कमावला होता. नायका कंपनीने मागील वर्षीच्या याच कालावधीत 1.17 कोटी रुपयेचा नफा कमावला होता. याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत नायका कंपनीचे एकत्रित सकल व्यापारी मूल्य वार्षिक 45 टक्के वाढून 2345.7 कोटी रुपयेवर गेले आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस Jefferies फर्मने नायका कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला गुंतवणुकदारांना दिला आहे. या स्टॉकवर “बाय” रेटिंग कायम ठेवण्यात आले आहे. ब्रोकरेज हाऊस Jefferies ने नायका कंपनीच्या शेअर्ससाठी 1,650 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

Nykaa कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
नायका कंपनीचे स्टॉक गेल्या 3 ट्रेडिंग दिवसात 15 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. सप्टेंबर 2022 चे सकारात्मक तिमाही निकाल आल्यावर नायका कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहे. Edelweiss फर्मने नायका कंपनीच्या शेअर्सवर “बाय” रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याच्या सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची लक्ष्य किंमत 1506 रुपये निश्चित करण्यात आली आहे. नायकाच्या शेअर्समध्ये मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. 28 ऑक्टोबर 2022 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 975.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. नायका कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 33 टक्के कमजोर झाले आहेत. त्याच वेळी, नायका कंपनीच्या शेअर्समध्ये या चालू वर्षात आतापर्यंत 45 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share Price performance after declaring profitable Quarterly Results on 03 November 2022.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x