23 April 2025 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

Nykaa Share Price | नायका शेअर्स फुल्ल डिमांडमध्ये, स्टॉकची 1 दिवसात 18 टक्के उसळी, स्वस्त झाल्याने खरेदी करावा?

Nykaa Share price

Nykaa Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालापूर्वी नायका कंपनीचे शेअर्स जबरदस्त डिमांडमध्ये आले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांनी नायका कंपंनीचे शेअर्स खालच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर खरेदी केले. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE वर नायका कंपनीच्या शेअरमध्ये 17.74 टक्क्यांची वाढ झाली असून, शेअरची किंमत 1157.55 रुपयांवर गेली होती. नायका कंपनीचे शेअर्सचे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त मागणीमुळे 6 टक्के वाढले होते. नायकाच्या शेअर्सनी देखील दिवसाच्या व्यवहारादरम्यान बीएसईवर 11790.75 रुपयांच्या अप्पर सर्किट किंमत पातळीला एकदा स्पर्श केला. नायका कंपनी जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीचे निकाल 1 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करणार आहे.

शेअर्स 62 टक्केपेक्षा जास्त घसरले :
नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांत कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 62 टेक पेक्षा अधिक कमजोर झाले होते. नायका कंपनीचे शेअर्स 28 ऑक्टोबर 2022 रोजी 975 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही किंमत कंपनीच्या शेअर्सच्या नवीन 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी आहे. नायका कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2574 रुपये आहे. नायका कंपनीचे शेअर्स या चालू वर्षी आतापर्यंत 44 टक्के कमजोर झाले आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 47 टक्के पेक्षा जास्त पडझड पाहायला मिळाली आहे.

Nykaa चे बोनस शेअर्स :
नायका कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 1 विद्यमान शेअरवर 5 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. कंपनीने नुकताच बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड डेटमध्ये बदल केला असल्याचे जाहीर केले आहे. नायकाने यापूर्वी बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख 3 नोव्हेंबर 2022 जाहीर केली होती, मात्र कंपनीने आता आपली रेकॉर्ड तारीख बदलून 11 नोव्हेंबर 2022 केली आहे. याव्यतिरिक्त, नायकाच्या प्री-IPO गुंतवणूकदारांसाठी निश्चित करण्यात आलेला लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

News Title| Nykaa Share Price Return on investment declared Bonus shares to existing shareholders on 01 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या