22 November 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

Nykaa Share Price | नायका कंपनीबाबत मोठी बातमी, याचा शेअरवर काय परिणाम होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?

Nykaa Share Price

Nykaa Share Price | नायका या कॉस्मेटिक्स टू फॅशन रिटेलर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा धडाका काही थांबत नाहीये. एप्रिल 2023 पासून आतापर्यंत कंपनीच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. नायका कंपनीने 2 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी शालिनी राघवन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन नोकरी सोडली आहे.

यापूर्वी कंपनीचे सीईओ विकास गुप्ता, चीफ बिझनेस ऑफिसर गोपाल अस्थाना, चीफ कमर्शियल ऑफिसर मनोज गांधी, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि नायका सुपरस्टोअरच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील नोकरी सोडण्याचा घोषणा केली आहे. याचा परिणाम स्टॉकवर देखील पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के घसरणीसह 146.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मागील बऱ्याच काळापासून सातत्याने पडझड पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 143.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नायका कंपनीने आपल्या एका निवेदनात माहिती दिली की, “स्ट्रॅटेजिक रिअलाइनमेंट, खर्चाचे तर्कसंगतीकरण आणि व्यवसायाची वाढती जटिलता लक्षात घेऊन कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ केली जाणार आहे. मात्र अधिकारी सातत्याने राजीनामा का देत आहेत, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

नायका ही कंपनी आपल्या वेबसाइटद्वारे आणि स्टोअरच्या माध्यमातून सौंदर्य प्रसाधने विकण्याचे काम करते. टाटा समूह आणि रिलायन्स सारख्या मोठ्या ब्रँड सोबत नायका कंपनीला स्पर्धा करावी लागत आहे. नायका कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. नायका कंपनीचे शेअर्स 246.16 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 41 टक्के कमजोर झाले आहेत.

नायका कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. त्यावेळी शेअरची किंमत बँड 1125 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर स्टॉकची लिस्टिंग किंमत 2000 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर सध्या आपल्या IPO किंमतीपेक्षा 87 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x