11 January 2025 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8.80 टक्क्यांच्या वाढीसह 1,891.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी अंश )

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जिओजितने ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉकवर 2,086 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून 12 महिन्यांसाठी ‘खरेदी’ करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 1.39 टक्के वाढीसह 1,833.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मार्च 2024 तिमाहीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 23 टक्के कमी झाला आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग लिव्हरेजमध्ये घट झाल्याने आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीचा मार्जिन 137 बेस पॉइंट्सने कमी झाला आहे. संपूर्ण वर्षासाठी कंपनीचा मार्जिन 127 बेस पॉइंटने वाढून 14.2 टक्के झाला आहे.

मागील एका आर्थिक वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला भारतातील विविध STUS कडून मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून 550 बसेसची ऑर्डर मिळाली आहे. तर बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगकडून 2,100 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. 10,000 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बस ऑर्डर मिळवणारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी भारतातील पहिली कंपनी आहे. या कंपनीला सर्व बस मॉडेल्सच्या EV बॅटरीसाठी AIS 038 प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने ईव्ही सेक्टरमध्ये आपली उत्पादन श्रेणी वाढवली आहे. या कंपनीने हायड्रोजन बससाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीसोबत भागीदारी करार केला आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीकडे सध्या 11,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसच्या ऑर्डर आहेत. या ऑर्डर्सची पूर्तता पुढील 12-24 महिन्यांत केली जाईल.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी Megha Engineering & Infrastructure Limited कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक बसेस बनवण्याचा व्यवसाय करते. तसेच ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युटर्स नेटवर्कसाठी सिलिकॉन रबर-कंपोझिट इन्सुलेटरचे उत्पादन करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price NSE Live 26 June 2024.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x