23 December 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

Page Industries Share Price | अंडरविअर बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, 9938% परतावा दिला, प्लस डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स

Page Industries Share Price

Page Industries Share Price | ‘पेज इंडस्ट्रीज’ या ‘जॉकी इनर वेअर’ ब्रॅण्डच्या मालक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जबरदस्त उसळीसह ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 1661 रुपयांपर्यंत वाढले होते. काल शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी पेज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के वाढीसह 38,699.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 6.7 टक्के वाढीसह 39651.90 रुपयांवर पोहोचले होते. दिवसभराच्या व्यवहारात शेअरने 37138.95 रुपये ही नीचांक किंमत ही स्पर्श केली होती. एका दिवसात या कंपनीच्या शेअरने 1661 रुपयेची उलाढाल केली होती. या कंपनीने गुरुवारी डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले, आणि विद्यमान शेअर धारकांना 60 रुपये प्रति इक्विटी शेअर म्हणजेच दर्शनी मूल्यावर 600 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. एमके ग्लोबल फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पुढील काळात पेज इंडस्ट्री कंपनीचे शेअर्स 48,800 रुपये किमतीवर जाऊ शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Page Industries Share Price | Page Industries Stock Price | BSE 532827 | NSE PAGEIND)

तिमाही निकाल :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये कंपनीच्या निव्वळ विक्रीमध्ये 2.81 टक्के वाढ झाली असून, कंपनीने 1,223.26 कोटी रुपयेची विक्री केली आहे. डिसेंबर 2021 मध्ये कंपनीचा सेल्स 1,18980 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 29 टक्के घट झाली असून, कंपनीने 123.73 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 174.57 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीचा EBITDA 24.61 टक्के ने कमी होऊन 194.40 कोटी रुपयेवर आला आहे. तर डिसेंबर 2021 मध्ये कंपनीचा EBITDA 257.87 कोटी रुपये होता. तिमाही निकाल जाहीर करताना कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी 600 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने 17 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

कंपनीच्या शेअरची कामगिरी :
‘पेज इंडस्ट्रीज’ कंपनीचा IPO 2007 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या मल्टीबॅगर स्टॉकने मार्च 2007 मध्ये सूचिबद्ध झाल्यापासून 15 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9938.23 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर्स 395 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वर्षी मार्च 2007 मध्ये शेअर 270 रुपये पर्यंत आला होता, मात्र आता शेअरची 39,651 रुपये प्रति शेअर पर्यंत वाढली आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
‘पेज इडन्ट्रीज’ कंपनी मुख्यतः इनरवेअरचे उत्पादन आणि रिटेल विक्री करणारी कंपनी आहे. ही कंपनी भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, कतार, मालदीव, भूतान आणि UAE मध्ये जॉकी इंटरनॅशनल ब्रँडची विशेष परवानाधारक कंपनी आहे. भारतामध्ये पेज इंडस्ट्री कंपनीकडे ‘स्पीडो गॅट’ चे उत्पादन विपणन आणि वितरण करण्यासाठी ‘स्पीडो इंटरनॅशनल लिमिटेड’ ची विशेष परवानाधारक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Page Industries Share Price 532827 PAGEIND stock market live on 11 February 2023.

हॅशटॅग्स

Page Pndustries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x