महत्वाच्या बातम्या
-
IIFL Wealth Hurun India Rich List 2021 | २०२१ मध्येही सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी टॉप
IIFL Wealth Hurun India Rich list 2021’ने जाहीर केलेल्या यादीनुसार मुकेश अंबानी यांनी यावेळीसुद्धा पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यापाठोपाठ मित्तल, दिलीप सांगवी, कुमार मंगलम बिर्ला आणि शिव नादर ही नावे आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Metro Train | मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी करताना आरेतील एकही झाड तोडायचं नाही - मुख्यमंत्री
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वे (Mumbai Metro Train) डब्यांची चाचणी मरोळ मरोशी येथे केली जाणार आहे. ही चाचणी करताना आरेतील एकाही वृक्षाला धक्का लागू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Jalyukt Shivar Abhiyan | जलतज्ज्ञ म्हणाले जलयुक्त शिवार’मुळे मराठवाड्यात महापूर | भाजपने जलतज्ज्ञांना मनोरुग्ण म्हटलं
पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. त्यानंतर गुलाब चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. गावं जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ओसंडून वाहत आहेत. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. आता मराठवाड्यातील महापुरावरुन जलतज्ज्ञांनी फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार अभियानावरून (Jalyukt Shivar Abhiyan) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महापुराची अनेक कारणं पर्यावरण अभ्यासकांनी मांडली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Midday Meal Scheme | मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार - मंत्री भुजबळ
महाराष्ट्रात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहिर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मध्यान्ह भोजन योजनेचा’ (Midday Meal Scheme) शुभारंभ झाला असून या योजनेअंतर्गत बांधकाम मजूरांना सकस आहार मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
3 वर्षांपूर्वी -
Shirdi Airport | शिर्डी विमानतळाजवळ सर्व सुविधांयुक्त शहर वसवणार | मुख्यमंत्र्यांची मंजुरी
विमानतळाच्या (Shirdi Airport) सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बुधवारी ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
LPG Gas Cylinder | मोदी है तो मुमकिन है | गृहिणींनो, गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता
एलपीजीच्या वाढलेल्या किंमतीने आधीच गृहीणींचे बजेट बिघडलेले आहे. अशावेळी घरगुती वापराच्या गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर १५ दिवसांनी २५-५० रुपयांची वाढ होत आहे. गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) महाग होत चालले आहेत. यात आता चीनमधील संकटाची भर पडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI Recruitment 2021 | SBI मध्ये 606 पदांची भरती | पगार पॅकेज 6 ते 45 लाख
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2021. एसबीआय भरती 2021. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Recruitment 2021) अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 606 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 18 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Poshan Abhiyaan | शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना | ईसीजीसीचा आयपीओ येणार - केंद्र सरकार
बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने मंत्रिमंडळाने अनेक मोठ्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने देशभरातील 11.2 लाखांहून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी पीएम पोषण योजना (PM Poshan Abhiyaan) सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही योजना 5 वर्षे चालेल आणि त्यासाठी 1.31 लाख कोटी रुपये खर्च येईल.
3 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने जनतेचे जगणे कठीण करून ७ वर्षांत इंधनामधून १३.५ लाख कोटी कमावले | भाजपचे आंदोलक आहेत कुठे? - काँग्रेस
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे गेले आहेत? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pune & Pimpri Chinchwad SRA | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील झोपडीधारकांना ३०० चौ.फुटांचा फ्लॅट मिळणार | पालकमंत्र्यांची घोषणा
राज्य सरकारने पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रारूप सुधारित नियमावलीत ही तरतूद करण्यात आली होती. आता मुंबई मध्ये पुणे आणि पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Bank holidays in October 2021 | ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बॅंका राज्यनिहाय तब्बल २१ दिवस बंद राहणार
पुढील ऑक्टोबर महिन्यात बॅंकांना तब्बल २१ दिवस सुट्या (Bank Holiday) राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबरचा संपूर्ण महिना सणांचा असतो. या महिन्यात एकामागून एक सण येतात. ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बँका बंद राहतील. या महिन्यात काही असेही दिवस येतील जेव्हा बॅंका सलग बंद राहणार.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | केंद्र सरकारने करकपात न केल्यास पेट्रोल-डिझेल अजून महागणार
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल भाव तीन वर्षांच्या विक्रमी तेजीवर पोहोचले आहे. याची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर पार पोहोचली आहे. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये हा ७८.२४ डॉलरवर होता. अमेरिकी कच्चे तेल डब्ल्यूटीआयही १.१% महाग होऊन ७४.८० डॉलर प्रति बॅरल झाले. दोन्ही इंधनांत सलग पाचव्या दिवशी उसळी दिसली. केंद्र व राज्य सरकारांनी कर कपात केली नाही तर भारतात आगामी दिवसांत पेट्रोल-डिझेलचे ३ रुपयांपर्यंत महाग (Petrol Diesel Price) होऊ शकते. एक महिन्याआधी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरल हाेते. म्हणजे, एका महिन्यात यात १४.३% ची वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीत हे प्रति बॅरल ५१ डॉलर होते. या हिशेबाने या वर्षी याच्या दरात ५६.९% ची वाढ झाली.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर | भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचेही कारखाने
इतिहासात पाहिलांदाच साखर कारखानदारीवर जाहीर आणि ठोस भूमिका साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची थेट यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच साखर आयुक्तालयाकडून अशी यादी काढण्यात आली आहे. राज्यातील एकूण 44 कारखाने हे रेड झोनमध्ये म्हणजे एफआरपी वेळेत न देणारे कारखाने म्हणून घोषित केले आहे. एवढ्यावरच साखर आयुक्त थांबले नसून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याना घालताना ही यादी लक्षात घेऊन ऊस कोणत्या कारखान्याला घालावा, असे आवाहनही केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jalyukt Shivar Yojana Scam | फडणवीस सरकारच्या काळातील 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू | फडणवीस अडचणीत
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी (Jalyukt Shivar Yojana) सुरू केली आहे. यात राज्यातील एकूण 924 कामांचा समावेश असून, अमरावती परीक्षेत्रातील एकूण 198 कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे 2014 ते 2019 मधील आहेत. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Babu George Valavi | 1978 मध्ये खरेदी केलेले 3500 शेअर्स | आज किंमत 1,448 कोटी | पण दुर्दैव पहा
छप्पर फाडून मिळते ते असे. ४३ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ३,५०० शेअर्सचा केरळच्या काेची येथील बाबू जॉर्ज वालावी यांना विसर पडला. आता त्याची किंमत १,४४८ काेटी रुपये आहे. पण कंपनीला आता त्यांचे पैसे द्यायचे नाहीत. ७४ वर्षांचे बाबू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हे प्रकरण सेबी कडे नेले आहे. ते कंपनीच्या शेअर्सचे खरे मालक आहेत आणि कंपनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्याला सेबीकडून नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा बाबू व्यक्त करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai River | मुबईतील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी BMC १३०० कोटी खर्च करणार | नद्यांच्या सौंदर्यीकरणावर भर
मुंबईतील नद्यांमध्ये प्रदूषण होत आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेला अनेकवेळा फटकारले आहे. त्यासाठी नद्यांचे सौंदर्यीकरण व सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार दहिसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचे पुनरुज्जीविकरण केले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ हजार ३०४ कोटी ५१ लाख रुपये खर्च करणार आहे. नदीच्या प्रदूषणाबाबत पालिकेने केलेले दुर्लक्ष व आता उशिराने आलेली जाग याबाबत विरोधकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये भारत बंदचा मोठा परिणाम
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन असेच सुरु राहील असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संपूर्ण देशात सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भारत बंदची हाक दिली आहे. या दरम्यान, संपूर्ण देशात शेतकरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन आणि रेल्वे रुळावरही आंदोलन करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | पेट्रोलनंतर डिझेलची शतकाकडे वाटचाल | सलग ३ दिवस दरवाढ
आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आलेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलचे दर ७० पैशांनी वाढलेत. देशामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
देशात को-ऑपरेटिव्ह बँकांच्या घोटाळ्यात महाराष्ट्र देशात अव्वल | फडणवीस सरकारच्या काळात सर्वाधिक घोटाळे - RBI रिपोर्ट
राज्यात पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा गाजला आहे. मात्र हा घोटाळा काही नवीन नाही. रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये को -ऑपरेटिव्ह बँकांचे घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. देशभरात को-ऑपरेटिव्ह बँकांचे जे घोटाळे समोर आले आहेत, त्यात महाराष्ट्र अव्वल आहे.
3 वर्षांपूर्वी -
Anandrao Adsul Vs ED | चौकशीनंतर आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात | तब्येत बिघडल्याने इस्पितळात दाखल
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB