महत्वाच्या बातम्या
-
Bharat Bandh | हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये भारत बंदचा मोठा परिणाम
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन असेच सुरु राहील असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संपूर्ण देशात सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भारत बंदची हाक दिली आहे. या दरम्यान, संपूर्ण देशात शेतकरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन आणि रेल्वे रुळावरही आंदोलन करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | पेट्रोलनंतर डिझेलची शतकाकडे वाटचाल | सलग ३ दिवस दरवाढ
आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आलेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलचे दर ७० पैशांनी वाढलेत. देशामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
देशात को-ऑपरेटिव्ह बँकांच्या घोटाळ्यात महाराष्ट्र देशात अव्वल | फडणवीस सरकारच्या काळात सर्वाधिक घोटाळे - RBI रिपोर्ट
राज्यात पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा गाजला आहे. मात्र हा घोटाळा काही नवीन नाही. रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये को -ऑपरेटिव्ह बँकांचे घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. देशभरात को-ऑपरेटिव्ह बँकांचे जे घोटाळे समोर आले आहेत, त्यात महाराष्ट्र अव्वल आहे.
3 वर्षांपूर्वी -
Anandrao Adsul Vs ED | चौकशीनंतर आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात | तब्येत बिघडल्याने इस्पितळात दाखल
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Amazon eCommerce | अमेझॉन मुंबई पुणे येथे गोदामे उघडणार | १.१० लाख नवीन रोजगार निर्माण होणार
ई-कॉमर्समधील प्रमुख कंपनी अमेझोनने (Amazon eCommerce) पुणे व मुंबई येथे मोठी गोदामे घेतली आहेत. तसेच मुंबईतील गोदामांचा विस्तार केला आहे. अमेझॉन कंपनीने महाराष्ट्रामध्ये एकूण दहा गोदामे उघडली आहेत. नऊ दशलक्ष क्युबिक फूट इतकी यांची क्षमता आहे. वराळे या गावात नवीन गोदाम ऊघडले आहे, जे ‘ पूर्तता केंद्र ‘ आहे.
3 वर्षांपूर्वी -
TATA Group ब्रँड ग्राहकांसाठी सर्वाधिक विश्वासार्ह | सर्वेमध्ये टॉप
१७ कॉर्पोरेट घराण्यांचा एक इक्विटीमास्टर सर्व्हे घेण्यात आला. टाटा, विप्रो आणि रिलायन्यासारख्या कंपन्या भारतात संकट काळामध्ये अनेक प्रकारे मदत देऊ करतात. कोरोना संकटकाळामध्ये टाटा ग्रुपकडून भारताला खूप मोठी मदत झाली. यासारख्या मोठ्या स्वदेशी कंपन्या कितपत विश्वासू आहेत यावर एक सर्वे करण्यात आला. त्यामध्ये लोकांनी या कंपन्यांची उत्पादने किती विश्वासू आहेत हे सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | शेतकरी आंदोलकांच्या उद्याच्या भारत बंदला विरोधी पक्षांचा एकमुखी पाठिंबा
केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या (२७ सप्टेंबर) भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धसत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होत असताना शेतकरी आंदोलकांनी भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे त्याला सर्वसामान्य जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयीच मूळात शंका आहे.
3 वर्षांपूर्वी -
National Cooperative Conference 2021 | देशाच्या कृषी बजेटवरून माजी कृषिमंत्र्यांना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी लगावला टोला
भारताचे पहिले सहकार मंत्री यांनी आज पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात सहकार क्षेत्रातील विविध मुद्यांना स्पर्श करत केंद्रातल्या मागच्या सरकारला कृषी बजेटचा “आरसा” दाखवून त्यांचे वाभाडे काढले. 2009-10 मध्ये कृषी क्षेत्राचे बजेट फक्त 12 हजार कोटी रुपये होते, असे त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा सांगून माजी कृषीमंत्र्यांना त्यांच्या कथित “अतुलनीय कामगिरीची” जाणीव करून दिली.
3 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या कर महसुलात ७४ टक्क्यांची वाढ | ५ लाख ७० हजार कोटी रुपये झाले जमा
कोरोना संकट असूनही केंद्र सरकारच्या कर संकलनात या वर्षी मोठी वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 22 सप्टेंबरदरम्यान निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 74.4 टक्क्यांनी वाढले आहे. कोरोनापूर्व काळात म्हणजेच 2019-20 मध्ये याच कालावधीत निव्वळ कर संकलनापेक्षा हे जास्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
मला महाराष्टाचा अर्थमंत्री केल्यास २० रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो - सुधीर मुनगंटीवार
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले आहे. राज्यातील जनतेला स्वस्तात स्वस्त पेट्रोल देण्याची इच्छाशक्ती राज्याने दाखवली तर राज्यात पेट्रोलच्या किंमती 20 रुपयांनी कमी होऊ शकतात, असे मत त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Indian Stock Market | भारतीय शेअर बाजार 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरचा होणार
भारतीय शेअर बाजार नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतीय बाजारपेठेतील परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास हे यामागील मोठे कारण आहे. या तेजीच्या दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय शेअर बाजाराने फ्रेंच शेअर बाजाराला मागे टाकत जगातील सहावा मोठा शेअर बाजार बनण्याचा बहुमान पटकावला.
3 वर्षांपूर्वी -
Monster Employment Index | रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक
रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत, पुणे बंगलोरनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या वेळी रोजगार निर्देशांक 40 टक्क्यांनी वाढला आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सने (Monster Employment Index) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर मोठ्या संख्येने लोक त्यांच्या गावी परतले.
3 वर्षांपूर्वी -
ITC Maurya Hotel Haircut Case | हेअर कट चुकला, महिलेला 2 कोटी भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश
देशातील ग्राहक न्यायालयाने लक्झरी हॉटेल चेन ITC ला एका महिलेला 2 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे म्हणणे आहे की, आयटीसी मौर्य हॉटेलने आशना रॉय नावाच्या या महिलेचे लांब केस कापले आणि केसांवर चुकीची ट्रीटमेंट दिली, ज्यामुळे महिलेचे मोठे नुकसान झाले. तिची जीवनशैली बदलली आणि तिचे अव्वल मॉडेल बनण्याचे स्वप्न भंगले. ही बाब एप्रिल 2018 ची आहे, ज्यावर न्यायालयाने 21 सप्टेंबर रोजी आपला निर्णय दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sensex Hits 60,000 Mark | शेअर बाजाराने इतिहास रचला | सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा गाठला
शेअर बाजारातील तेजीमुळे आज (24 सप्टेंबर) पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा उच्चांक गाठला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स 375 अंकांनी वाढून 60,260 वर स्थिरावला. तर तिकडे निफ्टी 106 अंकांनी उडी मारून 17,929 वर व्यापार करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Predator Drones Deal | राफेल डील नंतर प्रेडिएटर ड्रोन डील होणार | अमेरिकेकडून 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेण्याची योजना
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात काही महत्त्वाच्या संरक्षण डील होण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन ( 30 Predator drones) खरेदी करणार असल्याने पंतप्रधान मोदी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या CEOसोबत बैठक करणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Freshworks IPO | भारतीय कंपनीची अमेरिकी शेअर बाजारात कमाल | IPO येताच 500 कर्मचारी झाले करोडपती
बिझनेस सॉफ्टवेअर बनवणारी भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सची अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकवर शानदार लिस्टिंग झाली आहे. कंपनीने या लिस्टिंगमधून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7500 कोटी रुपये) गोळा केले आहेत, ज्यामुळे त्यांचे शेकडो कर्मचारी एका झटक्यात कोट्यधीश झाले आहेत. फ्रेशवर्क्सचे संस्थापक गिरीश मातृभुतम यांनी ही कमाल केली आहे. गिरीश मातृभुतम हे रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत आणि त्यांना त्यांचा आदर्श मानतात.
3 वर्षांपूर्वी -
Pegasus Snooping Case | सरकारने हेरगिरी केली की नाही?| सुप्रीम कोर्ट एक समिती स्थापन करणार
पेगासस सॉफ्टवेअरद्वारे पत्रकार, कार्यकर्ते, राजकारणी आणि देशातील अनेक प्रमुख लोकांच्या कथित हेरगिरीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय लवकरच एक समिती स्थापन करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण्णा या प्रकरणी पुढील आठवड्यात यासंदर्भात आदेश जारी करतील. सुनावणीदरम्यान, 13 सप्टेंबर रोजी सीजेआय रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात अंतरिम आदेश राखून ठेवला होता.
3 वर्षांपूर्वी -
भांडं फुटलं? | PM केअर्स हा भारत सरकारचा निधी नाही | पंतप्रधान कार्यालयाची दिल्ली हायकोर्टात माहिती
पंतप्रधान केअर्स फंड ही धर्मादाय विश्वस्त संस्था (ट्र्स्ट) आहे. हा निधी भारत सरकारचा नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. ही संस्था धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या कायद्यांतर्गत येत असल्याचीही माहितीदेखील केंद्र सरकारने न्यायालयात दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सामान्य लोकांना रडवणार? | 1 हजार रुपयांपर्यत जाऊ शकते घरगुती LPG सिलिंडर किंमत | अनुदानही बंद करण्याच्या तयारीत
देशातील वाढत्या महागाईचा सामान्य माणसाला आणखी एक धक्का बसू शकतो. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, येत्या काळात ग्राहकांना प्रति एलपीजी सिलिंडर 1000 रुपये मोजावे लागू शकतात. तर दुसरीकडे, केंद्र सरकार एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. तथापि, अजून अशी कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. मात्र, ग्राहक सिलिंडरसाठी एक हजार रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत, असे सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनातून समोर आले आहे. यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market Sensex Rises | सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला | गुंतवणूकदारांना 2 लाख कोटींचा फायदा
गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात जागतिक बाजारपेठेतून चांगले संकेत मिळाल्यानं झाली. साप्ताहिक फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) च्या समाप्तीच्या दिवशी सेन्सेक्स 430.85 अंकांच्या वाढीसह 59,358.18 वर उघडला. दुसरीकडे निफ्टी 124.2 अंकांनी वाढून 17,670.85 च्या पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 532 अंकांनी वाढून 59,459 च्या पातळीवर पोहोचला. ट्रेडिंगदरम्यान बाजाराला मोठ्या स्टॉक अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व, एसबीआय, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), एचडीएफसी बँक, इन्फोसिसमध्ये पाठिंबा मिळाला.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS