महत्वाच्या बातम्या
-
Magnetic Maharashtra | राज्यात 35 हजार 500 कोटींची गुंतवणूक | 1879 हेक्टरचा पवनऊर्जा प्रकल्प, 5 हजार रोजगार
देशातील ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग समूह जेएसडब्ल्यू एनर्जी राज्यात सुमारे ३५,५०० कोटींची गुंतवणूक करणार असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दीड हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प तर उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेेचे पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मग कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीला केलेल्या वाईट कामागिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का? - रघुराम राजन
भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात राजन बोलत होते. ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात विरोधकांचे महागाईविरोधात आंदोलन | डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या बैलगाडीवरून विधानसभेत
कर्नाटक काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सोमवारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या दरवाढी विरोधात सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष डीके शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या बैलगाड्यांवरून विधानसभेत पोहोचले. कर्नाटक विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी ही रणनीती आखली.
4 वर्षांपूर्वी -
आरोपांच्या आकड्यांचा हवेत गोळीबार? | किरीट सोमय्या यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा 30 जून 2022 पर्यंत घेता येणार लाभ | नोकरी गेल्यास सरकार भत्ता देणार
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) ‘अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना’ 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, या योजनेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत घेता येणार होता. परंतु, या योजनेत वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेत आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कोरोना काळात या योजनेचा लाभ आणखी काही लोकांना घेता यावा यासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
McDonald's Immunity Booster | आता McD'मध्ये मसाला कडक चहा आणि हळदीचे दूधही मिळणार
मॅकडोनल्ड्स इंडिया आता रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देत आहे. त्यांनी हळदीचे दूध आणि मसाला कडक चाय अशी दोन उत्पादने त्यांच्या मॅकॅफे मेनूमध्ये जोडली आहेत. ही दोन्ही उत्पादने मॅकेफे आउटलेटवर उपलब्ध असतील.
4 वर्षांपूर्वी -
आता पोस्टातून देखील मिळणार स्वस्त गृह कर्ज | कसं ते वाचा
गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे.आता गृहकर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाव लागणार नाही.नजीकच्या पोस्ट ऑफिसमधूनही आता तुम्ही स्वत गृहकर्ज घेऊ शकता. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीबीसी ) एलआयसी हाऊसिंग फायनान्स सोबत भागिदारी केली असून आयपीपीबीच्या 4.5 कोटी ग्राहकांना यामुळे एलआयसी-एचएफएलच्या गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होईल.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | किचन बजेट कोलमडणार | 1 ऑक्टोबरपासून CNG व PNG महागणार
सध्या इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. ऑक्टोबर महिन्यात या संकटात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलेंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या धोरणांवर टीका | न्युजक्लीक आणि न्युजलॉंड्री डिजिटल पोर्टलच्या कार्यालयांवर ED नंतर इन्कम टॅक्सची धाड
हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या ऑफिसवर फेब्रुवारी महिन्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला होता. अभिसार शर्मा सध्या newsclick.in नावाची वेबसाईट चालवतात. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच अनेक शोध पत्रकारितेतून त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचं वास्तव उघड केलं आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर न्युज पोर्टल्स मोदी सरकाविरोधात स्पष्ट बोलत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशात 5 नवीन विमानतळ, 50 नवीन मार्गही सुरु करणार | ज्योतिरादित्य सिंधियांची माहिती
देशातील अधिकाधिक भागात हवाई सेवा पोहोचावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने UDAN योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत हवाई सेवा लहान शहरांमध्ये सुरु करण्यात येत आहे. या दिशेने एक पाऊल पुढे जात सरकारने नवीन विमानतळ, हेलिपॅड आणि नवीन हवाई मार्ग सुरु करण्याची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची कारवाई
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीचं सावट आहे असं बोललं असताना अजून एका खासदारावर कारवाई करण्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांची निवासस्थाने तसेच कार्यालयांवर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी धाडसत्र राबविले. मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
ITR DATE | आयकर रिटर्न (ITR) भरण्याची मुदत पुन्हा वाढवली | ‘ही’ असेल शेवटची तारीख
आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर करण्यात आली होती. त्या आधी करदात्यांनी आपला आयकर भरावा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं होतं. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या आधी असलेली 31 जुलै ही मुदत वाढवून ती 30 सप्टेंबर केली होती. करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी परत एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे .आता शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत आणखी वाढविण्यात आली आहे
4 वर्षांपूर्वी -
भारतातील वाहन उद्योगाला धक्का | फोर्ड चेन्नई व गुजरात सदानंद प्रकल्प बंद करणार
वाहन उद्योगासाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकेतील वाहन कंपनी फोर्ड मोटर कंपनी भारतामधील दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करणार आहे. फोर्ड कंपनी केवळ विदेशामधून वाहने आयात करणार आहे. या वाहनांची कंपनीकडून भारतात विक्री करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
DHFL ६५ कोटींचं कर्ज प्रकरण | नीलम राणे व नितेश राणेंविरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी
‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लूक आउट नोटीस जारी करण्यात आली. कंपन्यांकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील कीर्तनकारांना बाप्पा पावला | कोरोना काळात राज्य सरकार महिन्याला 5 हजार रुपये मानधन देणार
उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. प्रताप सरनाईकांशी संबंधित NSEL प्रकरणी ईडीला हायकोर्टाचा दणका
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांशी संबंधित एनएसईएल प्रकरणी ईडीला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. या प्रकरणातील आरोपी योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपासयंत्रणेनं दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विकासक योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय समजले जातात. योगेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणी अटक केली होती.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका | केंद्राने मसूरच्या हमीभावात 400 आणि गहू प्रति क्विंटल 40 रुपयांनी वाढवला
कोरोना संकटामुळे त्रस्त असलेल्या कापड क्षेत्राला सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची ही बैठक झाली.
4 वर्षांपूर्वी -
Income Tax Return file | 'या' तारखेनंतर भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड
इनकम टॅक्स रिटर्न फाइल (Income tax return file) करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने नुकतीच त्याची मुदत वाढवली आहे. आता जर तुम्ही 30 सप्टेंबर नंतर रिटर्न भरले तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हे नियम इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बनवले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य नागरिक कधीही कर्ज बुडवत नाही | मोठी माणसेच नेहमी कर्ज बुडवतात - शरद पवार
देशात गुजरात आणि महाराष्ट्राचं योगदान हे सहकार क्षेत्रात खूप मोठं आहे. आज सहकार हा विषय देशपातळीवर बघणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह तर स्वतः हा अहमदाबाद सहकारी संस्थेचे संचालक होते. ज्या लोकांच्या आयुष्यातील काही कालखंड हे सहकारात गेलं, ते सहकाराला उद्ध्वस्त करू शकत नाहीत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC