18 April 2025 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

PAN Aadhaar Linking | दंड भरूण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा नाहीतर, पॅन कार्ड होईल रद्द

PAN Aadhaar Linking

PAN Aadhaar Linking | कोणतेही शासकीय काम करताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड मागितले जाते. हे दोन्ही फार महत्वाचे डॉक्यूमेंट आहेत. यात तुमची जन्म तारीख, पत्ता अशा सर्व गोष्टी लिंक केलेल्या असतात. आता जर तुम्ही एवढ्या काळात बॅंकेत कोणत्या कामासाठी गेले असाल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करुण घ्या असे सांगितले असेल. अनेकांनी ते केले आहे. मात्र अद्याप अनेक नागरिकांनी तसे केलेले नाही. येत्या काही दिवसांतच आता पॅन कार्ड बाद होणार आहे. अशात मोदी सरकारने सर्व नागरिकांना आधार पॅन लिंक करण्याचे आवाहन केले होते.

मात्र आता त्याची मुदतही संपली आहे. तर मग अशा परिस्थीतीत आता तुमचे पॅन आधारला लिंक करायचे राहिले आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. कारण शासनाने आता पुन्हा एकदा हे काम सशुल्क सुरू केले आहे. म्हणजेच ज्यांनी अजूनही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नाही त्यांना ते करुण दिले जाईल. मात्र त्यांच्याकडून दंड स्वरूपात शुल्क आकारले जाईल. याची अंतीम तारिख देखील जाहिर झाली आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत तुम्हाला दंड भरूण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची संधी आहे. परंतू त्यानंतर कोणतीही संधी दिली जाणार आणि तुमचे पॅन कार्ड रद्द होईल असे आदेश शासनाने दिले आहेत.

सशुल्क लिंकींगला सुरूवात
१ जुलै पासून ही सेवा सुरू होत आहे. यात तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागेल. त्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कले जाईल. एकून ९ महिने ही सेवा पुरवली जाणार आहे. ३१ मार्च २०२३ ही शेवटची तारिख आहे.

पॅन कार्ड होणार अवैध
इन्कम टॅक्स ऍक्ट कलम १३९ एए अंतर्गत तुमच्या पॅनवर कारवाई होईल. जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नाही तर या कलमानुसार अवैध मानले जाईल. तसेच ऑनलाईन आयटीआर भरण्यातही अडचणी येतील. तसेच तुमचे जुने रिफंड देखील अडकवून ठेवले जातील. तुमच्या कोणत्याही आर्थीक व्यवहारा पॅन कार्ड वापरता येणार नाही.

अवैध पॅन कार्ड वापराल तर होईल ही करावाई
इनकम टॅक्सऍक्ट कलम २७२ बी यानुसार तुम्ही अवैध पॅन कार्ड वापरले तर कारवाई होईल. तुमचे रद्द झालेले पॅन कार्ड तुम्ही कोठेही वापरू शकत नाही. मात्र जर याचा वापर करायचा असेल तर त्यासाठी पुन्हा एक अर्ज करावा लागेल. जर तुम्ही रद्द पॅन कार्ड वापरले तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच याता जितक्या वेळा वापर केला जाईल तितक्या वेळा तुमची दंडाची रकक् १० हजाराने वाढेल.

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन पध्दत

* सर्वात आधि www.incometaxindiaefiling.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या.
* यात तुम्हाला तुमचे रजिस्टेशन करावे लागेल.
* त्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.
* लॉगइन करुण प्रोफाईल सेटींग निवडा.
* यात तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय दिसेल तो निवडा.
* त्यात कॅप्चा आणि आधार क्रमांक टाका.
* पुढे दिसत असलेल्या लिंक आधारवर क्लिक करा मग तुमचे पॅनचे तपशील टाकून पॅन कार्ड लिंक होईल.

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
ई-फायलींगचा वापर करुन तुम्ही अल्फान्यूमेरिक परमनंट १२ अंकी नंबर आधार क्रमांकाला लॉगइन करु शकता. दोन्ही क्रमांक लॉगइन करताना तुमच्याकडे UIDPAN12 नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर लागेल. हे सर्व तुम्ही ५६७६७८ / ५६१६१ या क्रमांकावर मॅसेजद्वारे देखील पाठवू शकता.

* ऑनलाईन अर्ज करताना अडचणी येत असतील तर ऑफलाईन पध्दतीचा वापर करा. यासाठी NSDL आणि UTITSL च्या सेवा केंद्रावर भेट द्या. तसेच तुमचे सर्व तपशील तेशे जमा करा.
* शासनाने दिलेली वाढीव मुदत उलटून देखील तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नसेल तर तुम्हाला कोणत्याही कामात पॅन कार्ड वापरता येणार नाही.
* ही अट फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे. यात अनिवासी नागरिकांचा समावेश नाही. एनआरआय असलेल्यांना आर्थिक व्यवहारात आधार कार्ड विचारले जाते. जर त्यांच्याकडे आधार कार्ड असेल तर ते त्यांच्या पॅन बरोबर लिंक करू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PAN Aadhaar Linking Link PAN card to Aadhaar card on fine payment otherwise PAN card will be cancelled 31 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PAN Aadhaar Linking(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या