22 April 2025 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Paragon Fine Share Price | मार्ग श्रीमंतीचा! पॅरागॉन फाईन IPO शेअरने पहिल्याच दिवशी दिला 125% परतावा, पुढे किती परतावा मिळेल?

Paragon Fine Share Price

Paragon Fine Share Price | पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर यशस्वीरित्या सूचीबद्ध करण्यात आले आहेत. पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनी IPO शेअर्स 125 टक्के प्रीमियम वाढीसह 225 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.

या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 95 रुपये ते 100 रुपये दरम्यान निश्चित केली होती. आणि लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स IPO स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स स्टॉक 213.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 50 टक्के सबस्क्राईब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 35 टक्के सबस्क्राईब झाला होता. पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीने आपला IPO स्टॉक 95 रुपये ते 100 रुपये किंमत बँडवर ओपन केला होता.

गुंतवणूकदार या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत किमान 1200 शेअर्ससाठी बोली लावू शकत होते. पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या IPO चा आकार 51.66 कोटी रुपये होता. कंपनीने या IPO मध्ये एकूण 5,166,000 फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले होते. या IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्स विकण्यात आले नाही.

पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स ही कंपनी मुख्यतः अत्यंत जटिल आणि विशेष रासायनिक मध्यवर्ती केमिकल उत्पादनाच्या निर्मिती व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना पिगमेंट इंटरमीडिएट्स, डाई इंटरमीडिएट्स, फार्मा इंटरमीडिएट्स, अॅग्रो इंटरमीडिएट्स आणि कॉस्मेटिक इंटरमीडिएट्स पुरवण्याचे काम करते.

पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या प्रवर्तक गटात वल्लभ रतनजी सावलिया, रुतेश वल्लभभाई सावलिया, शिवम किशोरभाई पटोलिया, वल्लभ जसमत वसोलिया आणि किशोरकुमार पंचभाई पटोलिया सामील आहेत. IPO इश्यूपूर्वी कंपनीच्या प्रवर्तक गटाने कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते, तर IPO इश्यूनंतर त्यांचे भाग भांडवल प्रमाण 73.60 टक्केवर आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paragon Fine Share Price NSE 04 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Paragon Fine Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या