25 December 2024 12:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

Paytm Share Price | पेटीएमच्या तोट्यात कमालीची घट, शेअरमध्ये 2 दिवसात तुफानी वाढ, तेजी टिकुन राहील?

Paytm Share Price

Paytm Share Price | ‘पेटीएम’ या डिजिटल पेमेंट ॲपची मालक कंपनी ‘One 97 Communications’ चे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहेत. कंपनीने जबरदस्त आर्थिक तिमाही निकाल जाहीर करताच शेअरने उसळी घेतली. प्रथमच या फिनटेक कंपनीच्या परिचालन उत्पन्नात एका तिमाहीत वाढ पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या तिमाहीत ‘पेटीएम’ कंपनीचा तोटाही कमी झाला आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.55 टक्के वाढीसह 589.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

‘पेटीएम’ शेअर किंमतीचा इतिहास :
‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स आज 558.90 रुपये किमतीवर ओपन झाले होते, तर 589.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना खूप वैताग दिला होता. एका वर्षात शेअरची किंमत 42.58 टक्के घसरली होती. 2023 या नवीन वर्षात शेअरचे अच्छे दिन सुरू झाले. नवीन आरशात आतापर्यंत शेअरची किंमत 3.51 टक्के मजबूत झाली आहे. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 984.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 438.35 रुपये होती. पेटीएम स्टॉकबाबत 11 पैकी 8 तज्ञ उत्साही आहेत. तर 8 पैकी 5 जणानी शेअरवर स्ट्राँग बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 3 जणांनी खरेदीचा सल्ला दिला असून 2 तज्ञांनी स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.

‘पेटीएम’ कंपनीचे तिमाही निकाल :
डिसेंबर तिमाहीच्या निकालात कंपनीने जाहीर केले आहे की, पेटीएम कंपनीचा निव्वळ तोटा 392 कोटी रुपयेवर आला आहे. एका वर्षापूर्वी कंपनीच्या निव्वळ तोटा 779 कोटी रुपये होता. त्याच वेळी पेटीएम कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 42 टक्के वाढून 2.062 कोटी झाला आहे. व्यापारी वर्गणी महसुलात वाढ, कर्ज वितरणातील वाढ आणि वाणिज्य व्यवसायातील जलद वाढ यामुळे कंपनीच्या तोट्यात घट झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 1.4 दशलक्ष नवीन कर्जदार जोडले आहेत. कंपनीचे सरासरी मासिक व्यवहार वापरकरत्यांची संख्या 85 दशलक्षवर गेली आहे. पेटीएम कंपनीकडून कर्ज घेणाऱ्याची संख्या एका वर्षांपूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत 137 टक्के वाढून 10.5 दशलक्षवर गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 stock market live today as on 07 February 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x