19 November 2024 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Paytm Share Price | पेटीएमचा स्टॉक आता कमाई करून देणार, विश्लेषकांनी सांगितले वाढीचे कारण, जाणून घ्या नवीन टार्गेट प्राईस

Paytm Share Price

Paytm Share Price| ज्या वेळी Paytm चा IPO आला होता, त्यावेळी शेअर्सची इश्यू किंमत 2,150 रुपये निश्चित करण्यात आली होती. Paytm ने कंपनीने IPO च्या माध्यमातून 18,300 कोटी रुपये जमा केले होते. Paytm ने आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 1 लाख कोटी रुपये बुडवले असून आता शेअर बाजारातील तज्ज्ञाना स्टॉक मध्ये तेजी येण्याचे संकेत दिसत आहेत. गुंतवणूक तज्ञ आणि शेअर बाजारातील गुंतवणुकदार स्टॉक मध्ये वाढ होईल असा अंदाज वर्तवत आहेत. आणि नजीकच्या काळात Paytm चा स्टॉक 50 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये Paytm कंपनीचा शेअर NSE आणि BSE वर लिस्ट झाला होता. ज्यावेळी Paytm शेअर बाजारात सूचीबद्ध झाला तेव्हा त्याचे मार्केट कॅप 1.4 लाख कोटी रुपये होते, पण आता त्यात इतकी घसरण झाली आहे की Paytm चे बाजार भांडवल 43500 कोटींवर आले आहे. अशाप्रकारे, अवघ्या एका वर्षात पेटीएमच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 96,500 कोटी रुपये नुकसान केले आहे.

IPO लिस्टिंग च्या वेळी पेटीएम शेअरची इश्यू किंमत 2,150 रुपये होती, परंतु हा शेअर पडला आणि 1,950 रुपयांवर लिस्ट झाला. भारतीय आयुर्विमा महामंडळ/LIC नंतर भारतीय बाजारपेठेतील दुसरा सर्वात मोठा IPO Paytm चा होता. ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने नुकताच Paytm स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने Paytm शेअरची लक्ष किंमत 1,100 रुपये निश्चित केली आहे. आणखी एक प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म Jp Morgan Paytm शेअरला ओव्हरवेट रेटिंग दिली असून स्टॉक मार्च 2023 पर्यंत 1,000 रुपये पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुढील लक्ष किंमत 840 रुपये :
डेरिव्हेटिव्ह तज्ञ आणि शेअर बाजारातील ट्रेडर्सनी Paytm स्टॉकवर 840 रुपये लक्ष किंमत निर्धारित केली आहे. एकदा जर का हा स्टॉक 750 रुपयेची पातळी ओलांडला की तो पुढे 840 रुपये पर्यंत तेजीत वाढेल. जर Paytm च्या शेअरने 750 रुपयेची पातळी तोडली की पुढील तीन-चार आठवड्यांत तो 800-840 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. गुंतवणूक तज्ञांनी Paytm स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला असून लक्ष किंमत 840 आणि स्टॉपलॉस 710 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Paytm चे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्यास समजेल की शेअरला 22 ऑगस्ट 2022 रोजी 850 रुपयांच्या पातळीवर जबरदस्त प्रतिरोध मिळाला होता. यानंतर शेअर मध्ये सतत पडझड होत राहिली. जोपर्यंत हा स्टॉक आपली प्रतिरोध पातळी तोडत नाही तोपर्यंत यात गुंतवणूक करू नये असा सल्ला गुंतवणूकदारांनी आणि तज्ञांनी दिला आहे. Paytm शेअरची उच्च प्रतिरोध पातळी जवळपास 747 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Paytm Share price return on investment with new Target price for short term on 07 October 2022.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x