20 April 2025 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, शेअरची टार्गेट प्राईस तपासून घ्या

Highlights:

  • Paytm Share Price
  • शेअरची 52 आठवड्यांची पातळी
  • पेटीएम शेअरची कामगिरी
  • पेटीएम शेअरची टार्गेट प्राईस
Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएम कंपनीची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनच्या शेअर्समध्ये मागील सहा महिन्यांपासून कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 37.15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी

स्टॉक अजूनही 844.40 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपासून खाली ट्रेड करत आहे. 8 ऑगस्ट 2022 रोजी पेटीएम स्टॉकने उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 726.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पेटीएम कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 2150 रुपये निश्चित करण्यात आली होती.

पेटीएम शेअरची कामगिरी

पेटीएम कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत मे महिन्याचे बिझनेस अपडेट कळवले आहेत. पेटीएम कंपनीच्या पोस्टपेड आणि वैयक्तिक कर्ज वितरणात वाढ पाहायला मिळाली आहे. पेटीएम कंपनीने मोठ्या NBFC कंपन्या आणि बँकासोबत व्यापारी भागीदारी देखील केली आहे. पेटीएम कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे वितरित केलेल्या कर्जाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीकडे सध्या 7 कर्जदाते असून त्यांना आणखी तीनची गरज आहे.

पेटीएम शेअरची टार्गेट प्राईस

Q4 FY2023 मध्ये पेटीएम कंपनीला 168.4 कोटी रुपये इतका निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तर Q4 FY 2022 मध्ये कंपनीला 761.4 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 2,334.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या तिमाहीत कंपनीने 51.5 टक्के अधिक महसूल संकलित केला आहे. कंपनीची एकूण कामगिरी पाहून तज्ञांनी स्टॉकवर 900 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

प्रसिद्ध भारतीय ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने पेटीएम कंपनीच्या स्टॉकवर 900 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी तत्काळ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ब्रोकरेज फर्मला पेटीएम शेअर्समध्ये 26 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

ब्रोकरेज फर्म CLSA ने पेटीएम स्टॉकवर 850 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी स्टॉक खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला देखील दिला आहे. मागील सहा महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअरने चांगली कामगिरी केली आहे, म्हणून तज्ञ स्टॉक बाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Paytm Share Price today on 07 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या