5 February 2025 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Paytm Share Price Today | 67 टक्के स्वस्त झालेला पेटीएम शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाहीर, कारण काय?

Paytm Share Price

Paytm Share Price Today | ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ या ‘पेटीएम’ च्या मुख्य कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर स्टॉक वेगात धावू लागला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढीसह 729.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारी हा स्टॉक 689 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. प्रत्यक्षात कंपनीने मार्च तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या तोट्यात घट झाली असून, कंपनीचा तोटा 390 कोटीवरून 170 कोटींवर आला आहे.

कंपनीच्या कर्ज वितरण आणि महसुलात चांगली वाढ पहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, ही कंपनी लवकरच फायद्यात येऊ शकते. ब्रोकरेज हाऊसेस स्टॉकबद्दल सकारात्मक असून त्यांनी स्टॉकमध्ये 31 ते 35 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत, IPO किंमतीच्या तुलनेत स्टॉक 67 टक्के सवलतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची किंमत स्वस्त :
पेटीएम कंपनीचा IPO 2021 सालचा सर्वात लोकप्रिय होता. मात्र त्याने लिस्टिंग करताच गुंतवणूकदारांची घोर निराशा केली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर 689 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 18 नोव्हेंबर 2021 रोजी हा स्टॉक बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. IPO मध्ये कंपनीने शेअरची किंमत बँड 2150 रुपये निश्चित केली होती, मात्र स्टॉक 1955 रुपयांवर लिस्ट झाला होता. या घसरणीला कंपनीचे उच्च मूल्यांकन कारणीभूत असल्याचे मानले जाते.

तज्ञांचा गुंतवणूक सल्ला :
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या मते पेटीएम कंपनीच्या महसुलात चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे ऑपरेटिंग लिव्हरेज सुधारले असून समायोजित EBITDA 5 टक्केवर आला आहे. कंट्रिब्युशन मार्जिन आणि ऑपरेटिंग लिव्हरेजमध्ये सतत सुधारणा झाल्याने कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यातवाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्मची अपेक्षा आहे की कंपनी FY25 पर्यंत EBITDA ब्रेक-इव्हन स्पर्श करेल. पुढील काळात हा पेटीएम कंपनीचे शेअर्स 900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने पेटीएम कंपनीच्या स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 950 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते पेटीएम कंपनी रेव्हेन्यू मल्टिपलऐवजी नफ्यावर व्यापार करणारी पहिली भारतीय B2C इंटरनेट कंपनी बनू शकते. ब्रोकरेज हाऊसने 900 रुपयांच्या लक्ष्यासह स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच हा स्टॉक पुढील काळात सध्याच्या किंमतीवरून 35 टक्के अधिक वाढू शकतो.

चौथ्या तिमाहीची कामगिरी :
पेटीएम कंपनीचा तोटा तिसऱ्या तिमाहीत 390 कोटींवरून कमी होऊन 170 कोटींवर आला आहे. कंपनीच्या एकूण महसूलात 52 टक्के वाढ झाली असून कंपनीचा महसूल 2330 कोटीवर पोहचला आहे. UPI प्रोत्साहन मुळे कंपनीच्या तोट्यात 133 कोटीची घट झाली आहे. FY23 मध्ये कंपनीचा एकूण महसूल 61 टक्के वाढीसह 7990 कोटीवर पोहचला आहे. पेमेंट आणि वित्तीय सेवांमधून मिळणारा महसूल 59 टक्के वार्षिक वाढीसह 1920 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कॉमर्स आणि क्लाउड सेवांमधून मिळालेला महसूल 23 टक्के वाढीसह 390 कोटीवर पोहचला आहे.

वार्षिक GMV 40 टक्के वाढीसह 3.6 लाख कोटी रुपये वर पोहचला आहे. कंपनीचा कर्ज वाटप प्रमाण 253 टक्के वाढीसह 12550 कोटी रुपयेवर पोहचला आहे. Paytm कंपनीच्या ग्राहक आणि व्यापारी कर्जांमध्ये ही वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीचा पोर्टफोलिओ सुधारला असून बाऊन्स रेट मध्ये घट झाली आहे. कंपनीचा ECL कास्ट घटला असून योगदान मार्जिन देखील वाढण्याची शक्यता आहे. समायोजित EBITDA मार्जिनमध्ये अल्पावधीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price today on 09 May 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x